Monday, September 7, 2009

परब्रह्माची लक्षणे

दशक समास मध्ये समर्थांनी सांगितलेली ४२ लक्षणे
परब्रह्माची ४२ लक्षणे
१निराकार -आकार नसलेले , निराधार -आधार नसलेले , निर्विकल्प -कल्पना नसलेले
निरामय -आमय म्हणजे रोग ,नाश ,विकार .नाश विकार नसलेले , निराभास -भास नसलेले ,
निरावेव -अवयव नसलेले , नि :प्रपंच -प्रपंच नसलेले नि :कलंक -कलंक नसलेले
निरोपाधी -उपाधी नसलेले , निरोपम्य -उपमा नसलेले निरालंब -कशावरही अवलंबून नसलेले
निरापेक्षा-अपेक्षा नसलेले , निरंजन -प्राणीमात्रांचा संसर्ग नसलेले
निरंतर -अवकाश मोकळी जागा नसलेले
निर्गुण -गुण नसलेले नि :संग -आसक्ती नसलेले निर्मळ-मळ नसलेले
निश्चळ- स्वस्थिती पासून चळण नसलेले , नि :शब्द -शब्द किंवा भाषा नसलेले
निर्दोष -दोष नसलेले निवृती -कोणतीही वृती नसलेले नि :काम -कोणतीही इच्छा नसलेले
निर्लेप -कशालाही न चिकटलेले नि :कर्म -कोणतेही कर्म नसलेले नि :कर्म -कोणतेही कर्म नसलेले
अनाम्य -नाम नसलेले कारण त्याला जन्म ,रूप नाही ते इंद्रिय गोनाही
१० अगणित -परब्रह्माचे मोजमाप करता येत नाही अकर्तव्य -नीती अनितीच्या पलिकडे
११ अक्षै- झीज नाही अरूप -रूप नाही अलक्ष - मनाला आकलन होत नाही
१२ अनंत -ज्याला अंत नाही अपार -अमर्याद अढळ- स्थानाहून ढळत नाही
१३ अनंत -ज्याला अंत नाही अतर्क्य -बुध्दीला त्याच्या स्वरूपाची कल्पना अद्वैत -परब्रह्म एकच आहे हे पटणे
१४ अदृश्य -इंद्रिय गोचर नाही अच्युत - त्याच्या स्थानावरून घसरत नाही अछेद -तोड़ता येत नाही
१५ अदाह्य -जळत नाही अक्लेद -पाण्याने भिजत नाही .





No comments: