चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा -या साठी
समर्थांचा महंत ज्याने लोकसंग्रह करून देश ,देव ,धर्म याविषयी जागृती करायची आहे त्याच्या अंगी चातुर्याचीकोणती लक्षणे हवीत असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ उत्तर देतात :
अस्ति मासांची शरीरे । त्यांत राहिजे जीवेश्वरे । नाना विकारी विकारे । प्रवीण होइजे । । १५-१-१ | |
जीव जीवात घालावा । आत्मा आत्म्यात मिसाळावा । राहं राहो शोध घ्यावा । परांतराचा । । १५-१-४ | |
तैसेची हे मनास मन । विवेके जावे मिळोन । ढिलेपणे अनुमान । होत आहे । । १५-१-६ | |
या अस्थिमांसाने भरलेल्या शरीरात ईश्वर जीव रूपाने वास करतो .जसजसे शरीरात बदल होतात ,तसतसेजीवही आपल्यात बदल घडवून आणतो .प्रत्येकाच्या शरीरात असणारा जीवात्मा जाणीव मय असतो .त्याजाणीवेच्या सहाय्याने दस-याच्या अंत :करणात काय चालले आहे ते शोधता येते .आपल्या बोलण्यावागण्यानेदुस-याला काय वाटले असेल याची कल्पना करता येते .जसे ढिले ठेवलेले जानवे दिसायला चांगले दिसत नाहीत्याचे पदर गुंततात ,त्याउलट नीट ठेवलेले जानवे चांगले दिसते .तसे आपण विवेकाने दुस-याच्या भावना जाणूशकतो ,दुस -याच्या मनाचा ठाव घेता येतो ।
जो जगदांतरी मिळाला । तो जगदांतरचि जाला । अरत्री परत्री तयाला। काय उणे । । १५-१-१४ | |
एकदा का माणूस दुस-याच्या मनाचा ठाव घ्यायला शिकला ,की तो जगाच्या अंतरंगाशी एकरूप होतो ,सर्व लोकांचेअंत :करण तोच होतो .जसे समर्थ बालपणापासून विश्वाची चिंता करत होते .मग अशा माणसाला जग किंमतदेते ,मान देते .मग त्यांना वशीकरणासारख्या क्षुद्र गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही ।
लोकसंग्रह करताना भोवताली जमा होणारी माणसे कशी असावीत ,ते समर्थ सांगतात :
आचार विचारेविण । जे जे करणे तो तो सीण । धूर्त आणि विचक्षण । तेची शोधावे । । १५-१-२४ | |
जे लोक जे खरे नाही ते खरे मानतात ,त्याचा अभिमान धरतात ,जे खरे आहे ते सोडून देतात ,ते मूर्ख असतातआचार विचार न सांभाळता जे लोक काम करतात ,ते वाया जाते .म्हणून लोकसंग्रह करणा-यांनी सरसकटकोणालाही आपल्या हाताखाली घेऊ नये.चतुर व बुध्दीमान माणसे शोधून काढावी ।
याकारणे मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य । येणे करिता असंख्य । बाजारी मिळती । । १५-१-२६ | |
लोक संग्रह करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित माणसांशी स्नेह जोडावा ,त्यांच्या बरोबर सख्य जोडले तर त्यांनामानणारे असंख्य लोक आपल्याला वश होतात ।
समर्थाचे राखता मन । तेथे येती उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती । । १५-१-२९ | |
वोळखीने वोळखी साधावी । बुध्दीने बुध्दी बोधावी । नीती न्याये वाट रोधावी । पाषांडाची । । १५-१-३० | |
समाजातल्या प्रतिष्ठित माणसांना आपलेसे केले की सामान्य माणसे मेंढरासारखी मागे येतात म्हणून समर्थसांगतात की ओळखीने ओळख वाढवावी ,साधेपणाने रहात आपल्या बुध्दीने आपल्या शिकवणूकीतून लोकांची बुध्दी प्रगल्भ करावी .लोकां मध्ये आपलेपणा निर्माण करावा ।
वेष असावा बावळा । परी अंतरी नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये । । १५-१-३१ | |
निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान । प्रगट जाणता सज्जन । दुल्लभ जगी । । १५-१-३२ | |
नाना जिनस पाठांतरे । निवती सकळांची अंतरे । चंचळपणे तदनंतरे सकळां ठायी । । १५-१-३३ | |
बाहेरून वेष बावळा असला तरी अन्तर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे .लोकांचे अंत :करण सांभाळण्याचीहातोटी असावी .अत्यंत निस्पृह व नेहमी ताजे असणारे आत्मज्ञान त्याच्या जवळ ओतप्रोत भरलेले असावे .अनेकलोकांना आकर्षून घेण्याची कला त्याच्या जवळ असावी .त्याने सतत फिरत असावे .एका ठिकाणी थांबू नयेथांबल्याने भेटी गाठी होत नाहीत .लोकसंग्रह थांबतो .
, . .

2 comments:
Namaskar kaku ,
Me Mahavir Dhat , Heramb ch mitra
Khup chan mahiti dili ahe,
mala Avadali.
Regards,
Mahavir Dhat
नमो नम: महोदया:
मला आवडला हा उपक्रम. छान आहे. अभिनंदन !
धन्यवाद
मुकुंद: भालेराव:
औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य | भारतवर्ष
संकेतस्थल: www.mukundbhalerao.com
Post a Comment