Saturday, January 8, 2011

श्री समर्थांच्या निस्प्रुहाचा लोकसंग्रह

श्री समर्थांच्या निस्पृहाचा लोकसंग्रह

वाईट सामाजिक परिस्थितीत एखादा आगळा वेगळा असतो तो एक क्षणही वाया जाउ देत नाहीत .तो चतुर ,बुध्दिमान ,तारतम्य असणारा असतो .तो वाईट परिस्थिती मध्ये मार्ग काढतो ,कौशल्याने लोकसंग्रह करतो .त्यासाठी त्याच्या अंगी गुण असावे लागतात .ते कोणते ते समर्थ सांगतात :

नाना जिनस उदंड पाठ | वदो लागला धडधडात | अव्हाटची केली वाट | सामर्थ्यबळें | |१५-२ -१५ | |

प्रबोधशक्तींची अनंत द्वारे | जाणे सकालांची अंतरे | निरुपणे तदनंतरे | चटक लागे | |१५-२-१६ | |

मते मतांतरे सगट | प्रत्यये बोलून करी सपाट | दंडक सांडून नीट | वेधी जना | |१५-२-१७ | |

नेमके भेद्के वचने |अखंड पाहे प्रसंग माने | उदास वृत्तीच्या गुमाने | उठोन जातो | |१५-२ १८ | |

श्री समर्थांच्या निस्पृहाला अनेक विषयाचे ज्ञान पाठ असते .त्यामुळे तो सांगू लागतो .

लोकांना योग्य मार्गावर आणण्याचे अनेक उपाय तो जाणतो . लोकांचे अंत:कारण तो जाणत असल्याने ,लोकांना निरुपण ऐकण्याची गोडी कशी वाटेल ते तो जाणतो .त्याचे ज्ञान केवळ शब्दज्ञान नसून ते अनुभवजन्य असते त्यामुळे सगळी मते व मतांतरे तो खोडून काढतो लोकांना तो योग्य मार्गदर्शन करतो .त्याची निरुपणे ऐकून लोकांचे संशय नाहीसे होतात .प्रसंगानुसार तो वागतो .

तो कसा वागतो ?

प्रत्यये बोलोन उठोन गेला | चटक लागली लोकांना | नाना मार्ग सांडून त्याला | शरण येती | | १५-३-१९ | |

परी तो कोठे आडळेना | कोणे स्थळी सांपडेना | वेष पाहता हीन दीना | सारिखा दिसे | |१५-२-२० | |

उदंड करी गुप्तरूपे | भिका-यासारिखा स्वरूपे | तेथे यश कीर्ती प्रतापे | सीमा सांडिली | | १५-२-२१ | |

खनाळा मध्ये जाउन राहे | तेथे कोणीच न पाहे | सर्वत्रांची चिंता वाहे | सर्वकाळ | | १५-२-२३ | |

तो स्वानुभवाचे बोल बोलत असल्याने लोकांच्या मनाला जाउन भिडते .त्यामुळे त्याचे बोलणे ऐकण्याची लोकांना चटक लागते .मग लोक त्याला शरण जातात .त्याचे विशेष असे असते की तो कोठेही सापडत नाही .त्याचा वेषही हिनादिना सारखा असतो .तो कोणत्याही कार्यात पुढाकार घेत नाही .तो लोकांकडून काम करवून घेतो .दिसायला तो जरी भिका-या सारखा दिसत असला ,तरी त्याचे यश ,कीर्ती ,प्रताप सर्वत्र पसरतो .जेथे कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तो राहतो .एकांतात तो सतत लोकांच्या हिताची काळजी वाहतो .लोकांना त्याच्या शिवाय चैन पडत नाही .ते त्याला शोधत येतात .मोठा लोकसंग्रह तो करतो .मोठी संघटना तो निर्माण करतो .स्वत : गुप्त रहातो .पण त्याची लोकांवर सत्ता चालते .त्याचे अनुयायांचे समूह ठिकठिकाणी असतात .लोक त्या समूहांकडे आकर्षिले जातात .त्यामुळे परमार्थ बुद्धी दूरवर पसरते .उपासनेचा गजर ऐकू येतो .लोकांना त्याच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो .

No comments: