Tuesday, January 11, 2011

विश्व रचना -प्रकृती पुरुष यांचा खेळ

विश्वरचना : प्रकृती व पुरुष यांचा खेळ

मूळमाया हे विश्वरचनेचे मूळ आहे .प्रकृती व पुरुष ही मूळमयेची दोन अंगे आहेत .प्रकृती पंचभूतात्मक आहे तर तिच्यातील जाणीव पुरुष आहे .सृष्टीमधील विविधता त्रिगुणांची बनलेली असते .जसा प्रत्येक चराचराच्या ठिकाणी अंतरात्मा असतो ,तसा या विश्वाला सांभाळ करणारा अंतरात्मा असतो त्याला विश्वात्मा म्हणतात .तो या विश्वाचा नियंता असतो .समर्थ म्हणतात :

दोघां ऐसा तीन चालती | अगुणी अष्टधा प्रकृति | अधोर्ध सांडूनी वर्तती | ईंद्रफणी ऐसी || १५-५-१ ||

पणतोंडे भक्षितो पणजा | मूल बापास मारी वोजा | चुका-या गेला राजा | चौघा जणांचा || १५-५-२ ||

विश्वरचना म्हणजे जणू प्रकृती व पुरुष यांचा खेळच ! अशी कल्पना केली .समर्थ म्हणतात ;दोघां ऐसे तीन चालती शक्तीमय प्रकृती व जाणीवमय पुरुष यांच्या मार्गदर्शना खाली सत्व ,रज ,व तम हे तीन गुण चालतात .तीन गुण व पंचमहाभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते . ती सूक्ष्म रूपात निर्गुण परब्रह्म रूपात असते .पण परब्रह्म निश्चळ असल्याने ते काही करत नाही .दृश्य विश्व जड असल्याने काही कळत नाही .म्हणून सूक्ष्म व चंचळ अष्टधा प्रकृती सर्व विश्व खेळ खेळते .

विश्वाच्या उभारणी साठी कारणीभूत असलेल्या दोन अंगांपैकी पुरुष म्हणजे मूळपुरुष आहे . अंतरात्मा त्याचा मुलगा आहे .सत्वगुण किंवा विष्णू ,नातू रजोगुण किंवा ब्रह्मदेव ,पणतू तमोगुण किंवा महेश .मूळपुरुष अंतरात्मा पणजोबा जो ज्ञानमय असतो .सत्वगुण म्हणजे स्वस्वरूपासाठी असलेली त्याची आवड .रजोगुण किंवा ब्रह्मदेव म्हणजे विषयासंबधी आसक्ती ! या विषयासक्ती मुळे माणूस भगवंताला विसरतो .कारण तो अज्ञानात अडकतो ,सत्वगुण विसरतो ,तमोगुण म्हणजे अज्ञान .तमोगुण अंतरात्म्याला म्हणजे पणजोबाला झाकतो .मुलगा बापाला मारतो ,म्हणजे रजोगुण सत्वागुणाला बाजूला सारतो .अंतरात्म्याचा म्हणजे स्वस्वरूपाचा लोप होतो आणि परब्रह्माची प्राप्ती होते .

No comments: