Tuesday, January 11, 2011

अवतारी कोण ?

अवतारी कोण ?

विश्वाचा पसारा पंचमहाभूतांचा आहे ।ज्याप्रमाणे दोरा शेवटपर्यत असतोच तसा पंचभूतांच्या या दृश्य विश्वात अंतर्यामी पणे वास करतो .

मुळापासून सैरावैरा | अवघा पंचीकर्ण पसारा | त्यात साक्षत्वाचा दोरा | तोही तत्वरूप | | १५-३-१ | |

पंचभूतानी निर्माण केलेल्या दृश्य विश्वाच्या मुळापर्यंत गेले तर आपल्याला जावे लागते .त्यावरून लक्षात येते की या पसा-यात साक्षीभावाने राहतो तो अंतरात्मा ! जसा एखादा राजा सिंहासनावर बसलेला असतो ,त्याचे सैन्य दोन्ही बाजूला दाटून उभे असते ,तसे या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत .त्या तत्वांचा साक्षी असणारा अंतरात्मा राजासारखा असतो .

देहमात्र अस्तिमांशाचे | तैसेची जाणावे नृपतिचे |मुळापासून सृष्टीचे | तत्वरूप | | १५-३-३ | |

रायाचे सत्तेने चालते | परंतू अवघी पंचभूते | मुळी अधिक जाणीवेचे | अधिष्ठान आहे | |१५-३-४ | |

सैनिक जसा हाडांमासांचा असतो तसा राजाही असतो ,तसे पंचभूतात्मक जगत व त्याचा साक्षी तत्वरूपच असतात .राज्याच्या सत्तेने सैन्य चालते ,राजा व त्याचे लोक पंचभूतात्मक असले तरी राज्याच्या ठिकाणी सत्ता अधिक असते .पण अंतरात्मा जाणीवेच्या अधिश्ठानाने श्रेष्ठ ठरतो . म्हणून तो दृष्टा साक्षी असतो ,पं ते केवळ दृश्य विश्व असे पर्यंत .

विवेके बहु पैसावले | म्हनौन अवतारी बोलिले | मनु चक्रवर्ती जाले | येणेची न्याये | |१५-३-५ | |

मी देह नाही ,मी आत्मा आहे ,हा विवेक ज्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात असतो ,त्यांना अवतारी पुरुष म्हणतात .

आपण सर्वसाधारण पणे वयावर मोठेपण ठरवतो .जो वयाने मोठा तो मोठा असे म्हणतो .पण प्रत्यक्षात ज्याच्यात बुद्धीची आत्मानात्म विवेकाची मोठी वाढ झालेली असते तो थोर ! कारण त्याच्यात सर्वज्ञानसंपन्न ,सर्वगुणसंपन्न ,सर्वसामर्थ्यसंपन्न अशा अंतरात्म्याला जागा करण्यासाठी ,त्याच्यात गुणांची ,बुद्धीची ,आत्मानात्मविवेकाची वाढ झाली असते .अंतरात्मा जागा होतो ,तेव्हा त्याच्यातील जाणीव विशाल होते ,तेव्हा त्याला अवतारी पुरुष म्हणतात .अशी विशाल जाणीव असलेली माणसेच खरी थोर व भाग्यशाली असतात .कारण त्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केलेले असते .


No comments: