Wednesday, December 31, 2008

नवविधा भक्ती

नवविधा भक्ती च्या नऊ पाय-या
श्रवण
भक्तिमार्ग आचरणात कसा आणायचा असे शिष्यांनी विचारले ,
कैसे करावे भगवद भजन कोठे ठेवावे हे मन
भगवद भजनाचे लक्षण मज निरोपावे -१० -७२ शिष्याने सद्गदित होउन ,समर्थांचे चरण घट्ट धरून प्रश्न विचारला .समर्थ मनापासून प्रसन्न झाले ,त्यांनी सांगायला सुरुवात केली
श्रवणं कीर्तनं विष्णो :स्मरणं पादसेवनम्अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम। ।
नवविधा भक्तीत श्रवण ही पहिली पायरी आहे ,तर आत्मनिवेदन ही शेवटची .श्रवण भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार आहे.श्रवण शब्द्दाचा अर्थ ऐकणे आहे असे आपण म्हणतो ,पण श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नाही तर ऐकलेले जीवनात उतरवणे.कौरव पांवांची एक गोष्ट आहे .कौरव पांडवांचे गुरु क्रुपाचार्यांनी मुलांना एक धडा दिला -नेहमी
खरे बोलावे क्रोध करू नये .दुसा -या दिवशी कृपाचा-यांनी मुलांना विचारले ,मुलांनो काल काय शिकलात ?'
मुलांनी दोन्ही वाक़ये पाठ म्हणून दाखवली .युधिष्ठीराने सांगितले ,'माझी दोन्ही वाक़ये पाठ झाली नाहीत .'१० -१२
दिवसाने युधिष्ठीराने पुन्हा तेच उत्तर दिले तेव्हा कृपाचा-यांना काळजी वाटू लागली .त्यांनी भिष्माचा-यांना सांगितले .युधिष्टीर भीष्माचा -यांना म्हणाला .'गेल्या १० -१२ दिवसात मी नेहमी खरे बोललो .त्यामुळे ते वाक्य पाठ झाल्यासारखे आहे .पण क्रोध करू नये हे वाक्य पाठ होत नाही .कारण काहीतरी कारणांनी राग येतोच.भीष्मांना आनंद झाला .आपल्या नातवाला ऐकणे श्रवण यातला फरक कळला
समर्थांनी परमार्थाचे मुख्य साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण अनेक विषयांचे करायला सांगितले आहे -कर्ममार्ग
ज्ञानमार्ग ,सिध्दांतमार्ग ,योगमार्ग ,वैराग्य मार्ग ,नाना व्रते ,नाना तीर्थ ,नाना दाने ,नाना महात्मे ,योग ,मुद्रा ,आसने पिंड ज्ञान सृष्टीज्ञान ,संगीत ,चौदा विद्या ,चौष्ट कला ,या सर्व गोष्टी श्रवण करायला सांगतात .परमार्थ मार्गाला
लागणारा साधक चाळीसी पन्नासी नंतर लागला तर तो हे सर्व वाचू शकणार नाही ,मग समर्थांनी हे सर्व वाचायला
का सांगितल ? कारण समर्थांच्या पुढे त्यांचे कार्य पुढे नेणारा त्यांचा महंत होता .तो बहुश्रुतच असायला हवा होता त्याला लोकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता यायला हवे .सामान्य साधक जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्याला समर्थ मार्गदर्शन करतात
ऐसे हे अवघेची ऐकावेपरंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावेया नाव श्रवण भक्ती । । - -२९ । ।
सार म्हणजे समर्थांनी सांगितलेली उत्तम लक्षणे,चातुर्य लक्षणे ,सदविद्या लक्षणे ,सत्वगुण लक्षणे ,सार घ्यायचे
म्हणजे वर सांगितलेले सद्गुण आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करणे ,असार जाणून टाकावे म्हणजे मूर्ख लक्षणे ,
पढ़त मूर्ख लक्षणे ,कुविद्या लक्षणे ,तमोगूण लक्षणे या समासातील दुर्गूण काढून टाकणे
श्रावणात केवळ ऐकणे नसते ,तर ऐकलेल्या गोष्टींचे मनन व्हावे लागते निदिध्यास ही
या नावे जाणावे मननअर्थालागी सावधान निजध्यासे समाधानहोत असे । । - -३९ । ।
मनन म्हणजे आपण जे ऐकतो त्याचे चिंतन करणे ,त्याचे अर्थाकडे क्ष देणे .निदिध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची
मनाला लागलेली ओढ़ .
श्रवण कसे करावे ?
श्रवण करावे बिरबलाच्या मूर्ती सारख! एकदा अकबराने तीन सारख्या मूर्ती आणल्या .सर्वात चांगली मूर्ती कोणती ते बिरबलाला शोधून काढायला सांगितल .त्या तीनही मूर्तींच्या कानात छिद्र होती .बिरबलाने तीनही मूर्तींच्या कानातील छिद्रातून बारीक तार घातली .एका मूर्तीच्या कानातून घातलेली तार दुस-या कानातून बाहेर आली दुस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर आली .तिस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार हृदयातून आली.बिरबलाने सांगितले 'ही तीसरी मूर्ती चांगली आहे.'तो म्हणाला ,'श्रोते तीन प्रकारचे असतात .एक
प्रकार म्हणजे एका कानाने ऐकून दुस -या कानाने सोडून देतात .दुसरे श्रोते एका कानाने ऐकतात ऐकलेले
दुस-याला सांगतात .तिसरे श्रोते कानाने ऐकलेले ह्रुदयात साठवतात .त्याचे मनन ,चिंतन करतात
श्रवण कोणाकडून करावे ?
वक्ता असावा साचार। अनुभवाचा . असे समर्थ म्हणतात . बोले तैसा चाले असा वक्ता असला तर त्याचे बोलणे
लोकांच्या मनावर ठसते .संत वाड्मय संतांच्या अनुभवातून आलेले असते .त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचे केलेले वाचन
श्रवण असते . वाड्मय वाचणे म्हणजे गुरुमुख श्रवणच !
श्रवणाने काय प्राप्त होते ?
श्री बेलसरे म्हणतात ,परमार्थात पाच गोष्टी आवश्यक असतात - संशय शंका hफिटणे दृश्याची आसक्ती कमी
होणे, भगवंत हवा असे मनाला वाटणे .प्रतिभा जागी होणे .मन एकाग्र करण्याची कला साध्य होणे
केवळ पारमार्थिक उन्नती होते असे नाही तर व्यावहारिक गोष्टी कळतात
श्रवण कशाचे करावे ?
जेथे संशय तुटती होये आशंका निवृती
अद्वित ग्रंथ परमार्थी करावे - -
ज्या ग्रंथात संतांनी त्यांचा अनुभव भाशाबध्द केलेला असतो ,त्यांना समर्थांनी अध्यात्म ग्रन्थ आहे .
त्याना अद्वैत ग्रन्थ असेही म्हणतात .अध्यात्म ग्रन्थ श्रवण करावे असे समर्थ म्हणतात .परन्तु सावध ही करतात .
जे काही श्रवणी पडिले तितुके समजोनी विराले
तरीच काही सार्थक जाहले निरुपणी। । -१० -१६ । ।
जे जे काही श्रवण केले ते ते नीट समजून मनन केले तरच निरूपणाचे सार्थक झाले असे म्हणता येइल असे समर्थ म्हणतात .सर्वात शेवटी समर्थ एकांत करायला सांगतात .सार काय ,असार काय शोधायला एकांत करायला सांगतात एकांतात चाणा करता येते ,योग्य अयोग्य काय ते कळते,आपल्या चुका कळतात.

2 comments:

paamar said...

kaku, mi heramb cha mitr nikhil marathe. Heramb pointed me to your blog as he saw Ramdas Swami's photo in my orkut album. Felt really nice to see your blog. Will keep visiting it !

pankay said...

Namaste Kaku.aplya blog vishyi mala sakalchya mukatapithmadhun mahiti milali.mala ethe eh suchvavase vatate ki baryach websitevar samarthache dasbodh,manache shlok,karunastake vachayala milatat.pan ya vatirikat samarathani khup likhan kele ahe.pan te milat nahi.te jar aplya blog var milu shakel tar khu chhan hoil.apya ya blogla khu khup shubechha.