Friday, December 10, 2010

पंचमहाभूतांचा मूळमायेत लय कसा होतो ?

पृथ्वी जळापासूनि जाली पुढे ती जळी मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली तेजापासून १४-- | |
ते जळ तेजे शोषिले । महत्तेजे आटोन गेले पुढे तेजचि उरले सावकाश | | १४-- | |
तेज जाले वायो पासूनि वायो झड़पे तया लागूनी तेज जाऊनी दाटणी । वायोचीच जाली १४-९- | |
वायो गगना पासुनी जाला मागुता तेथेची विराला ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री १४-- | |
गुणमाया मूळमाया परब्रह्मी पावती लया ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे १४--१० | |
पाण्यापासून पृथ्वी झाली ,पण ती पाण्यात बुडते ,विरते .तेजापासून पाणी तैयार होते पण पाण्याला तेज शोषतेमहातेजाने पाणी आटते ,तेज शिल्लक उरते .वायु पासून तेज होते .मग वायु तेजाला विझवतो .मग तेज जावूनवायु सर्वत्र गच्चपणे भरून रहातो .वायु आकाशापासून निर्माण होतो .वायु आकाशातच विरतो .गुणमायाजिच्यामुळे पंचमहाभूते निर्माण होतात ,तिच्यात आकाश लय पावते .गुणमाया मूळमायेत लय पावते ,आणि मूळमाया परब्र्ह्मात लय पावते .
.

No comments: