Tuesday, December 28, 2010

माया कल्पना मात्र कशी असते ?

दशक १४ ,१० मध्ये श्री समर्थांनी माया कल्पना मात्र कशी असते ते दाखविण्यासाठी अनेक दाखले दिले आहेत
माया म्हणजे काय ? माया म्हणजे असते एक आणि दिसते भलतेच .माया कशी असते ते सांगताना श्री समर्थ म्हणतात :
करंटा पडो उताणा करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया १४-१०- | |
द्रव्यदारेचे स्वप्नवैभव नाना विलासे हावभाव क्षणिक वाटे परी माव तैसी माया १४-१०- | |
गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे नाना रूपे नाना विकारे तैसी माया १४-१०- | |
लक्ष्मी राया विनोदाची बोलता वाटे साची मिथ्या प्रचित तेथेची तैसी माया १४-१० - | |
मेल्याचा मोहोछाव करणे सतीचे वैभव वाढवणे मसणी जावून रुदन करणे तैसी माया १४-१० - | |
राखेसी म्हणती लक्ष्मी दूसरी भारदोरी लक्षुमी तीसरी नाममात्र लक्षुमी तैसी माया १४-१०- | |
मुळी बालविधवा नारी तिचे नाव जन्म सावित्री कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया १४-१०- | |
दशअवतारातील कृष्णा उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदी नामे पियुष्णा तैसी माया १४-१०-१० | |
एकदा करंटा माणूस उताणा पडून आकाशाकडे पहातो आहे .मनात नाना प्रकाराच्या कल्पना करतो आहे .त्यापैकी एकही कल्पना प्रत्यक्षात घडत नाही ,तशी माया असते .एका माणसाला स्वप्न पडले ,त्यात त्याने बायको आणिपैसा यांचे वैभव पाहिले ,नाना प्रकाराचे विलास पाहिले ,हावभाव पाहिले ,पण तो जसा भास् असतो तशी मायाअसते .आकाशात अनेक प्रकाराची गंधर्व नगरे निरनिराळे आकार असतात ,त्यात अनेक रूपे अनेक विकारदिसतात ,पण तो नुसता देखावा असतो .माया तशीच असते .एखाद्या प्रेताचा महोत्साव करणे,सती जायलानिघालेल्या स्त्रीचे वैभव वाढवणे ,स्मशानात जाऊन रडणे,या गोष्टी जशा कल्पनामय असतात ,तशी मायाकल्पनामय असते
ठेवलेल्या बाईला लक्षुमी म्हणतात ,गर्भपात व्हावा म्हणून गर्भवतीच्या कमरेला दोरी बांधतात त्या दोरी लालक्षुमी म्हणतात .अशी माया असते .एखादी बालविधवा आहे ,पण तिचे नाव जन्मसावित्री आहे .आडनाव कुबेरआहे पण घरोघरी भीक मागतो आहे ,हे जसे आहे तसे मायेचे स्वरुप आहे .अशा पध्दतीने श्री समर्थांनी मायेचेस्वरुप सांगितले आहे .समर्थ म्हणतात :
साऊली आणि अंधकारयेक होता तेथीचा विचारउगाचि दिसे भासमात्रतैसी माया । । १४-१०-१६ | |
सावली आणि अंधार दोन्हीत प्रकाश नसतो .त्यात प्रत्यक्ष वस्तू दिसत नाही .पण वस्तूच्या आकाराची किंचितसावली दिसते ,यावरून परब्रह्माचा विचार आपल्याला करता येतो .माया म्हणजे अंधार ,दृश्य म्हणजे सद्वस्तूचीसावली ,मायामय मी असतो ,देहाहंकार असतो .तो छाया रूपाने दृश्य विश्व पहातो .कारण त्याच्या जवळअज्ञानाचा अहंकार असतो .त्यामुळेच त्याला [मीला] ब्रह्मस्वरूपाचे खरे ज्ञान होत नाही .

No comments: