Friday, April 3, 2009

या नाव ज्ञान

जेथे दृश्य प्रकृति सरेपंचभूतिक वोसरे
समूळ द्वैत निवारेया नाव ज्ञान । । - - । ।
ज्या अवस्थेत प्रकृतिचा पसारा संपतो ,पंचभूतांचा डोलारा मावळतो,मी -तू हा द्वैत भाव मावळतो ,त्या अवस्थेला ज्ञान असे म्हणतात .अंतरात्म्याची उपासना करता करता ज्यावेळेस अंतरात्मा हाच खरा देव असे कळते ,देह नाशिवंत आत्मा शाश्वत असा अनुभव येतो ,हा अंतरात्माच अनंत रूपाने भेदाने या विश्वात व्यापून आहे याचा अनुभव येतो .अंतरात्माच या सर्व विश्वाचा कर्ता करविता आहे हे लक्षात येते .अंतरात्माच परब्रह्मातील शुध्द जाणीव आहे ,याची जाणीव होते .या प्रकृतितील दृश्य पसारा नाशिवंत आहे याचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनातही येतो .अनेक जीव रोज जन्माला येतात ,अनेक देह रोज पडतात .सुनामी ,भूकंप ,नद्यांना आलेले पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तिंनी अनेक शहरे ,काळाच्या ओघात नाहिशी होतात .त्यावरून दृश्य प्रकृती नाशिवंत आहे हे पटते .
प्रकृति पंचमहाभूते त्रिगुणांची मिळून बनलेली आहे .त्यामुळे पंचमहाभूते ही नाशिवंत आहेत .जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय होतो तेव्हा पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्याच्या उलट क्रमाने एकमेकात विलीन
होतात .पंचमहाभूते ही नाशिवंत असल्याने प्रत्येक सगुण नाशिवंत आहे हे कळते .त्यामुळे घर ,
घरातल्या वस्तू ,आई ,वडील ,मुले ,व्यवसाय या सर्वांबद्दल वाटणारा माझेपणा संपतो .मी पणा संपतो .मी पणा संपल्याने जीव शिवातील संपते. जीव शिव एकरूप होतात .तेव्हा मिळते ते ज्ञान !
तुकाराम महाराज म्हणतात ,देव पहाया गेलोदेवाची होउनी ठेलो । । किंवा' आता उरलो उपकारापुरता । 'अशी अवस्था येते .अशी अवस्था येण्यासाठी समर्थ महावाक्यांचे विवरण करायला सांगतात .त्या वाक्यांचा जप करायला सांगत नाहीत .
समर्थ म्हणतात ,
महावाक्याचे विवरणहे मुख्य ज्ञानाचे लक्षणशुध्द लक्षांशे आपणवस्तुच आहे । । - -१४ । ।
तत् त्वं असि
तत् म्हणजे ते म्हणजे वाच्यांशाने शिव ,ईश्वर, लक्षांशाने परब्रह्म ,चैतन्य .
त्वं म्हणजे तू .म्हणजे वाच्यांशाने जीव लक्षांशाने कूटस्थ चैतन्य ,
असि म्हणजे आहेस .
जर परब्रह्मामध्ये काही भाग ईश्वराने व्यापला आहे असे मानले तर त्यातल्या छोट्या भागावर दृश्य विश्व मानले तर ईश्वर जीव या दोन्ही भागात ईश्वराची शक्ती आहेच .म्हणजे जीव शिव एकच झाले .तर कूटस्थ चैतन्य हे परब्रह्मच आहे असे मानता येते .असे मानण्याची अवस्था म्हणजे ज्ञानाची अवस्था ! त्या अवस्थेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात :
ज्ञानवन्ही प्रगटेतेणे दृश्य केर आहेतदाकार मूळ तुटेभिन्नत्वाचे । । - -५० । ।

No comments: