Wednesday, April 22, 2009

समाधान कसे असते ?

समाधान
समाधान पुसता काहीम्हणती बोलिजे ऐसे नाहीतरी ते कैसे आहे सर्वहीनिरोपावे । । -१० - । ।
मुक्याने गुळ खादलागोडी ये सांगाव्यालायाचा अभिप्राव मजलानिरूपण कीजे -१० - । ।
अनुभव पुसो जाताम्हणती ये की सांगताकोणापासी पुसो आतासमाधान । । - १० - । ।
समाधान कसे असते असे विचारले तर ते सांगता येत नाही .शब्दाने वर्णन करता येत नाही .जशी गुळाची किंवा साखरेची गोडी गूळ किंवा साखर खाल्याशिवाय कळत नाही .त्याच प्रमाणे समाधानाचा अनुभव मिळाल्याशिवाय समाधान कसे असते ते कळत नाही .समर्थ म्हणतात ,
जे बोलास आकळेनाबोलल्याविणहि कळेनाज्यास कल्पिता कल्पनाहिंपुटी होये। । -१० - । ।
समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही ,पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही
नाही .त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ति पराभूत होते .समाधान केवळ संत संगतीनेच प्राप्त होते.सद्गुरुकृपेने समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा क्रम समर्थ सांगतात -
दृढ करूनिया बुध्दीआधी घ्यावी आपशुध्दीतेणे लागे समाधीअकस्मात । । -१० -१२ । ।
बुध्दीचा दृढ निश्चय केला की मी कोण आहे याचा शोध सद्गुरु कृपेने घेता येतो .शोध घेता घेता एकदम समाधी
लागते . आत्मबोध होउन बुध्दी स्थिर होते .
आपले मूळ बरे शोधिताआपली तो माईक वार्तापुढे वस्तूच तत्वतासमाधान । । -१० -१३ । ।
जेव्हा आपले आपण मूळ शोधायला जातो म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा कळत की आपल
शरीर म्हणजे एक तत्वांच गाठोडं आहे .म्हणजे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेल आहे .पंचमहाभूते नाशिवंत आहेत .आपला सूक्ष्म देह हा विचारांचे तरंग आहे .आपला कारण देह ही अज्ञानाची अवस्था आहे .महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे .आपला स्थूल ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण हे सर्व देह म्हणजे मी नाही हे
कळते ,आपल्यामधील चैतन्य शक्ती म्हणजे आपले आत्मस्वरूप म्हणजे मी याचा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे समाधान !याचा अनुभव येण्यासाठी घालवावा लागतो मीपणा! समर्थ म्हणतात -
जेथे मुराले मीपणतेचि अनुभवाची खूणअनुर्वाच्य समाधानयाकारणे बोलिजे । । -१० -१७ । । जेव्हा मीपणा संपूर्ण विरतो ,तेव्हा परमात्म वस्तूचा अनुभव येतो .त्यामुळेच मिळणारे समाधान मीपणाने वेगळेपणाने सांगता येत नाही .

No comments: