Thursday, April 16, 2009

दृश्य का दिसते ?

दृश्य मिथ्या तरी का दिसते ?
मागा श्रोती पुसिले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते याचे उत्तर बोलिजेल ते सावध ऐका
- -
जे आपल्या डोळ्यांना दिसते ते मिथ्या आहे तरी ते का दिसते असे शिष्य समर्थांना विचारतात .या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ अनेक दृष्टांत देतात दाखवून देतात की इंद्रियांना जे दिसते ते खरे नसते .
मृगे देखिले मृगज तेथे धावते बरळ
जळ नव्हे मिथ्या सकळ त्या पशूस कोणे म्हणावे - -
हरिण मृगज पाहते तेथे खरोखर पाणी असे वाटून वेड्यासारखे धावत सुटते .
रात्री स्वप्ने पडतात ,त्या स्वप्नात एखाद्याने पाहिले की खूप धन सापडले आहे त्याने ते देणे-यांना दिले .पण स्वप्नात दिलेले धन प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडत नाही .
एका कुशल चिता-याने सुंदर चित्र तयार केले .एका माणसाचे त्या चित्रावर प्रेम बसले .पण खरे काय आहे ते तो पाहू लागल्यावर त्याच्या हाताला माती लागते .लाकडाच्या ,पाषाणाच्या सुंदर प्रतिमा मनाला मोहून जातात ,पण जवळ जाऊन पाहू लागल्यास लाकूड किंवा दगड हाताला लागतात .
या सर्व उदाहरणावरून समर्थ सांगतात -
मिथ्या साचासारिखे देखिलेपरी ते पाहिजे विचारिले
दृष्टी तरळता भासिलेते साच कैसे मानावे । ।- -१३ ।।
खोटे -या सारखे दिसते तेव्हा ते खरोखर खरे आहे का याचा विचार केला तर ते खरे नाही मिथ्या आहे हे कळते.ईंद्रियाना जे दिसते ते फसवे असते ते सांगण्यासाठी समर्थानी उदाहरणे दिली आहेत -
नृपतीने चितारी आणिलेज्याचे त्या ऐसे पुतळे केले
पाहता तेचि ऐसे गमलेपरी अवघे माईक । । --१५ । ।
राजाने शिल्पकार बोलावून पुतळे बनवून घेतले .पुतळे पाहिल्यावर प्रत्यक्ष व्यक्ती आहे असे वाटे पण ते पुतळे होते व्यक्ती नव्हत्या .जादुगार जादूचे खेळ करतो .त्याने निर्माण केलेल्या वस्तू -या वाटतात .पण खेळ संपल्यावर पाहिले तर त्या खोट्या होत्या असे कळते .जशी माणसांची जादूगरी असते ,राक्षस कृत्रिम निर्माण करतात ते इंद्रजाल किंवा वोडंबरी असते ,तसे भगवंतानी जे कृत्रिम निर्माण केलेले असते त्याला माया म्हणतात .
हे साचासारिखे दिसेविचारिताच नसे
मिथ्याची भासेनिरंतर पाहता । । - -३४ । ।
भगवंताची माया सुध्दा -या सारखी वाटते ,पण विचार केला तर ती खोटी आहे हे कळते ,कारण -
साच म्हणावी तरी हे नासेमिथ्या म्हणावे तरी हे दिसे
दोहीं पदार्थी अविश्वासेसांगता मन । । - -३५ । ।
माया खरी मानावी तर ती नाश पावते ,खोटी मानावी तर प्रत्यक्ष दिसते .त्यामुळे ती खरी आहे हे मनाला पटत नाही खोटी आहे यावर विश्वास ठेवत नाही .मन दोलायमान होते .विचारात गोंधळ होतो कारण असते अविद्या !
दृश्य खरे वाटणे ही अविद्या आपला दे खरा वाटणे ही सुध्दा अविद्या ! देह्बुध्दी मुळे जे जे दिसते ते ते खरे वाटणे ही माया ! द्रष्टा आपला देह खरा आहे असे मानतो ,बघितलेली वस्तू खरी मानतो ,त्यामुळे द्रष्टा दृश्य यात वेगळेपणा
निर्माण होतो दृश्य मिथ्या तरी ते दिसते .

No comments: