Tuesday, April 28, 2009

अजन्मा कोण ?


अजन्म्याचे स्वप्न

अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता ते माया मुळीच स्तां त्यासी काय म्हणावे -१० -३३
अनुभव अनुभव घेणारा हे दोन्ही मायेमुळे निर्माण होते .मायाच नाहीशी झाली तर अनुभवाला जागाच राहात नाही .त्यामुळे मी आत्मा अनुभवला असे बोलता येत नाही .वेगळेपणा किंवा दोनपणा मायेने निर्माण
होतात .ज्याप्रमाणे वांझ बाईची मुलगी खोटी असते त्याप्रमाणे माया खोटी असते ,वेगळेपण खोटे असते .जीवात्मा परमात्मा एकच अभिन्न असतो .ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी समर्थ सांगतात :
अजन्मा होता निजेला। तेणे स्वप्नी स्वप्न देखिलासद्गुरूस शरण गेलासंसार दु:खे । । -१०-३६ । ।
सद्गुरुकृपेस्तव । जाला संसार वावज्ञान जालिया ठावपुसे अज्ञानाचा । । -१० -३७ । ।
आहे तितुके नाही जालेनाही नाहीपणे निमालेआहे नाही जाऊन उरलेनसोनि काही । । -१० -३८ । ।
ज्याला जन्म मरण नाही असा अजन्मा झोपला ,झोपेत त्याने एक स्वप्न पाहिल ,की आपल्याला खूप संसारदु :
झाले आणि आपण सद्गुरुला शरण गेलो .सद्गुरू कृपेने कळले की हा संसार मिथ्या आहे .मी देह आहे हे अज्ञानही मावळले .मी आत्मा आहे हे ज्ञान झाले .
अजन्मा म्हणजे मूळ स्वयंप्रकाशी आत्मस्वरूप स्वानंदात होते .त्याला झोप लागली .झोप म्हणजे अज्ञान त्यामुळे
स्वस्वरूपाचा विसर पडला .त्याला स्वप्न पडले म्हणजे आपण देहरूप आहोत असा भास झाला .त्याला भेदाने भरलेले दृश्य विश्व दिसू लागले .त्याला संसार दु : झाले म्हणजे दृश्यातील द्वैतामुळे त्याला भय वाटले .स्वप्नात स्वप्न पडले की आपण सद्गुरूंना शरण गेलो ,त्यांनी आपल्यावर कृपा केली .सद्गुरू कृपेने ज्या संसाराला आपण घाबरलो ते स्वप्न होते हे कळले .दृश्य विश्व स्वप्नवत आहे .ते खरे मानून त्यात कल्पनेने होणारे
व्यवहार ,स्वप्नातील स्वप्ना प्रमाणे असतात हे कळले .
झोपलेल्या माणसाला जागा झाल्यावर स्वप्नात पाहिलेले खोटे हे त्याला कळते ,तस देह्बुध्दी मरून अज्ञान विरले संसार मिथ्या वाटतो .वस्तू आहे नाही हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या कक्षेत येतात .त्यामुळे ते अनुभव फक्त दृश्य विश्वाला लागू पडतात .

No comments: