Friday, August 7, 2009

अजन्मा तो तूच

अजन्मा तो कोण ?
शिष्य पुन्हा प्रश्न विचारतात ,
अजन्मा तो कवणतेणे देखिला कैसा स्वप्नतेथे कैसे निरूपणबोलिले आहे । । -१० -४८ । । अजन्मा कोण आहे ?त्याने कोणते स्वप्न पाहिले ?त्या कोणते निरूपण सांगितले आहे ?
समर्थ उत्तर देतात :
ऐक शिष्या सावधानअजन्मा तो तूच जाणतुवां देखिला स्वप्नी स्वप्नतेही आता सांगतो । ।
-१० -५० । ।
स्वप्नी स्वप्नाचा विचारतो तू जाण हा संसारयेथा तुवां सारासारविचार केला । । -१० -५१ । ।
शिष्या ,अजन्मा तू आहेस .स्वप्नामध्ये स्वप्न म्हणजे हा संसार .मी आत्मा हे जागेपण जाऊन 'मी देह 'हे स्वप्न ! माझा संसार हे स्वप्नामाधाले स्वप्न आहे .नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास .त्यांच्या तोंडून आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस .आपण स्वप्नात आहोत हे तुला पटले.त्यानंतर आत्मस्वरूपाचा तू साक्षात अनुभव घेतलास .त्यामुळे तुझे आत्मस्वरूपा बद्दलचे शब्दज्ञान तोके पडले .अत्यंत निवांत विश्रांतीचे स्थान तुला मिळाले.तेच तुझे जागेपण असे समज.शब्द ज्ञानाची गड़बड़ थांबून अर्थ प्रकट होतो तेव्हा अंतरी अनुभव आल्यासारखे वाटते .ह्यालाच जागृती म्हणतात असे तुला वाटेल ,पण तो भ्रम असतो .दृश्याचा अनुभव लयाच्या अनुभवात विरतो .मी अनुभव घेतो ही वृत्ती विरते .केवळ अनुभव्रूपता रहाते.तरी तू स्वप्नातून जागा होत नाहीस .संपूर्ण जागेपणा हा 'मी तो अजन्मा ' या अनुभवा पलिकडे असतो .शब्दांनी तो सांगता येत नाही .म्हणून समाधान वर्णन करून सांगता येत नाही.म्हणूनच समाधान अनिर्वाच्य आहे असे म्हणतात .

No comments: