Monday, August 10, 2009

बध्द ,मुमुक्षु साधक सिध्द

समर्थांनी सांगितलेला क्रमविकास :बध्द ,मुमुक्षु ,साधक ,सिध्द
बध्द
श्री के .वि .बेलसरे त्यांच्या ग्रंथात म्हणतात ,पृथ्वीला समांतर असणा-या एका सरळ रेषेवर सर्व माणसे उभी केली तर रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी माणसे रेषेचा अंत्यबिंदू म्हणजे ज्ञानी माणसे पृथ्वी वरील समांतर रेषेला मध्य बिंदू मानला तर लोकांचे आणखी दोन वर्ग मानता येतात .आरंभ बिंदुकडून मध्यबिंदूकडे सरकणारी माणसे , मध्यबिंदू कडून अंत्य बिंदूकड़े सरकणारी माणसे .
पहिल्या बिंदूवरील लोक म्हणजे अज्ञानी म्हणजे बध्द ,मध्य बिंदूकडे सरकणारे मुमुक्षू ,मध्य बिंदूकडून अंत्य बिंदूकड़े सरकणारे साधक ,अंत्य बिंदूवरील पोहोचलेले सिध्द .
समर्थांनी सांगितलेला हां क्रमविकास आहे .या व्यतिरिक्त पाचवा वर्ग अस्तित्वात नाही .
बध्द कसा असतो ?
बध्द म्हणजे बांधलेला .कामिनी कांचनाच्या सापळ्यात अडकलेला असतो .
आता बध्द तो जाणिजे ऐसाअंधारीचा अंध जैसाचक्षुवीण दाही दिशासुन्याकार । । - - । ।
अंध माणूस जसा चाचपडत जातो त्याप्रमाणे बध्द माणूस अज्ञानाच्या अंधारात वावरत असतो .त्यामुळे त्याला भक्ती ,ज्ञान ,वैराग्य ,मोक्ष,साधन ,निश्चितपणे देव ,संताचा विवेक त्याला कळत नाही .कर्म ,अकर्म ,धर्म ,
अधर्म ,कळत नाही परमार्थ पंथ कितीही सुगम असला तरी दिसत नाही.पोटात भूतदया नसते ,देहाची स्वच्छता नसते .लोकांचे अंत :करण शांत करणारी मृदू वाणी नसते .
जयास नाही आत्मज्ञानहे मुख्य बध्दाचे लक्षण - -१८ । ।
त्याच्याकडे आत्मज्ञानाचा अभाव असतो .त्याला तीर्थ ,व्रत ,दान ,पुण्य काहीच करायच नसत. दया ,करूणा ,नम्रता सरलता हा कोणताच गुण त्याच्या जवळ नसतो .त्याच्याकडे सर्व गोष्टीँचा अतिरेक असतो .समर्थांनी बध्दांचे वर्णन करणारा मनाचा श्लो़क लिहिला आहे :
अति मूढ़ त्या दृढ़ बुध्दी असेना
अति काम त्या राम चित्ती वसेना
अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा
अति वीषयी सर्वदा दैन्यवाणा। । ६४ । ।
या शिवाय बध्दांचे वर्णन करणा-या ओव्या पुढील प्रमाणे:
नेत्री द्रव्य दारा पहावीश्रवणी द्रव्य दारा ऐकावीचिंतनी द्रव्यदारा चिंतावीया नाव बध्द । । - -४० । ।
काया वाचा आणि मनचित्त वित्त आणि प्राणद्रव्य दारेचे करी भजनया नाव बध्द । । -- ४१। ।
द्रव्य दारा तेचि तीर्थद्रव्य दारा तोचि परमार्थद्रव्यदारेसि लावी सकलया नाव बध्द । । - -४३ । ।
द्रव्य दारेशी तो बध्द असल्यामुळे त्याला अनेक चिंता ,अनेक उद्वेग ,अनेक दू : सहन करावी लागतात ,त्यामुळे चित्त दु:श्चित्त रहाते आणि हातून परमार्थ घडत नाही .

No comments: