Monday, August 24, 2009

साधक

साधक कोणाला म्हणावे?

आपल्यातील अवगुणांचा त्याग करून संतांची संगती जो धरतो संत त्याला आपला म्हणतात त्या मुमुक्षुला साधक म्हणतात .संत मुमुक्षुला आपला म्हणतात .तेव्हा त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात .तेव्हा मी कोण हे त्याला स्वानुभवाने पटते .संसाराचे बंधन तुटते.म्हणजे त्याने संसार सोडावा लागत नाही .फक्त तो संसार अलिप्त पणे करू लागतो .साधनही तो सोडत नाही .संसारातील अलिप्त पणामुळे इतर विषय त्याला आकर्षित करत नाहीत .साधना दृढ करण्याचा तो प्रयत्न करतो .त्यासाठी तो सतत प्रयत्न करतो .सतत श्रवण करतो .तो तूच आहेस या महा वाक्यांच्या निरूपणाची गोडी त्याला लागते .श्रवणा नंतर मनन ,चिंतन करण्याची त्याला सवय लागते .त्यामुळे शब्दांच्या सूक्ष्म अर्थाकडे तो वळतो.श्र वणात आत्मानात्म विवेक मांडला तर मन लावून ऐकतो .त्यातून त्याला असलेले संशय तो फेडून घेतो .आत्मज्ञान दृढ करतो .
संत पले सर्व संशय फेडतात त्यासाठी तो संत संगती धरतो .गुरुप्रचिती ,शास्त्रप्रचिती ,आत्मप्रचिती एकच आहे हे तो अनुभवतो .त्यासाठी देह्बुध्दी विवेकाने तो बाजुला सारतो ,म्हणजे मी देह नाही ही मिथ्या भावना विवेकाने बाजूला सारतो .आत्म बुध्दी सुदृढ करतो म्हणजे मी देह नसून आत्मा आहे असे मानतो .इंद्रिय गोचर नसलेली ब्रह्मवस्तू बघण्याचा एकाग्र होउन प्रयत्न करतो .आत्म्याशी तदाकार होउन राहण्याचा अभ्यास करतो .म्हणजे मी देह नाही आत्मा आहे असे अनुसंधान ठेवतो .आत्म्याशी ठेवलेले अनुसंधान दृत्वाने धरलेले असते .
ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन करताना वाचा कुंठीत होते ,दृष्टीला जे दिसत नाही ,तेच आत्मस्वरूप साधक अनेक प्रयत्नांनी धरतो .ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन करताना मनही पोचत नाही ,जेथे तर्कही चालत नाही त्याचा अनुभव साधक घेतो .आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो .
साधक देहावरील प्रेम नाहीसे करतो त्यामुळे त्याच्यातील अनेक दुर्गुण नाहीसे होतात .अनेक भ्रामक कल्पना नाहीशा होतात .षड्रिपू त्याच्या पासून दूर पळतात तो कुलाभिमान सोडतो ,वैराग्याच्या जोरावर तो परमार्थ वाढवतो .वैभव ,मानसन्मान बाजूला सारतो .संशय विकल्प नाहीसे करतो .आत्मस्वरूपी लीन झाल्याने संसाराचे भय त्याला वाटत नाही .काळाची तो तंगडी मोडतो म्हणजे तो आत्मस्वरूपाशी अनुसंधान साधल्याने निर्भय होतो .आत्मबुध्दी असल्याने देह्बुध्दी नाहीशी होते .त्यामुळे देह्बुध्दी मुळे येणारी दू :खे नाहीशी होतात .
आत्मज्ञानाने साधकाचा विवेक शक्तीमान होतो .त्यामुळे स्वस्वरूपा बद्दल दृढ निश्चय होतो .अवगूणांचा नाश
होतो .अवगुणांची जननी आसक्ती सुध्दा विवेक वैराग्याने नष्ट होते .समर्थ म्हणतात :
विसरास विसरलाआळसाचा आळस केलासावध नाही दुश्चित्त झालादुश्चित्तपणासी । । - -५८ । । साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो .त्याचे अखंड स्मरण ठेवतो .तो आळसाचा आळस करतो .
तो चित्तविक्षेप होऊ देत नाही .चित्त व्यग्र नसते म्हणजे अनेक गोष्टीत मन पसरत नाही .संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगूण सोडतो तो साधक असतो .

No comments: