Wednesday, September 21, 2011

सत्व ऱज तम

सत्व ,रज ,तम

मुळी देह त्रिगुणाचा | सत्वरजतमाचा | त्यामध्ये सत्वाचा |उत्तम गुण ||२-५-१ ||

सत्वगुणे भगवदभक्ती | रजोगुणे पुनरावृत्ती | तमोगुणे अधोगती |पावती प्राणी ||२-५-२ ||

आपला देह सत्व ,रज व तमोगुणांच्या मिश्रणाने बनला आहे .सत्वगुणाने भगवद भक्ती उत्पन्न होते ,रजोगुणा मुळे पून्हा पून्हा जन्म घ्यावा लागतो .तामोगुणांमुळे खालच्या योनीत जन्म घ्यावा लागतो .अध:पतन होते .

त्रिगुणांचे मूळ बघायला गेले तर ते मूळमायेत सापडते .परब्रह्मात निर्मांण झालेला संकल्प म्हणजे मूळमाया .मूळमाया विकार पावली आणि त्रिगुण निर्माण झाले .त्रिगुण निर्माण झाले म्हणून मूळमायेला गुणक्षोभिणी म्हणतात .सत्व ,रज तम हे तीनही गुण माणसात असतात .

त्यातही शुध्द आणि सबळ | तेही बोलिजेती सकळ | शुध्द तेचि जे निर्मळ | सबळ बाधक जाणावे || २-५-३ ||

शुध्द सबळाचे लक्षण | सावध परिसा विचक्षण | शुध्द तो परमार्थी जाण | सबळ तो संसारिक ||२-५-४ ||

तया संसारिकांची गती | देही त्रिगुण वर्तती | येक येता दोन जाती | निघोनिया ||२-५-५ ||

गुणांमध्ये शुध्द व सबळ असा भेद आहे .जे निर्मळ असते ,ते शुध्द असते .जे मिश्रित असते ते शबल असते .शबल गुण नेहमी घातक असतो . शुध्द गुण पारमार्थिक असतो .तर शबल गुण सांसारिक असतो .प्रापंचिक माणसामध्ये तिनही गुण असतात .एकां गुणाचा जोर होतो मग बाकीचे गुण मागे पडतात .

सत्वगुणी शांत ,प्रेमळ , निस्पृह ,निष्कपट ,अंत:करणातील सुख पाहणारी ,आत्मनिष्ठ ,अंतर्भोगी असतात .सत्वबुद्धीने वागणारी ,अभिमान नसणारी ,मनाची एकाग्रता साधणारी असतात .अंत:करण विवेक वैराग्य यांनी परिपूर्ण असते .साधकांना सात्विकांचा संग योग्य असतो .उपदेश घेण्यास अधिकारी असतो .

रजोगुणी खटपट करणारा ,कपटी,आशावादी ,बहुरूपी ,ढोंगी ,भोगी ,ईंद्रीय सुख घेणारा ,नेहमी दु:खी असणारा असतो अभिमानी असतो ,त्यामुळे सतत दु:खी असतो मन चंचल ,आशेने मलीन झालेले असते .मन एकाग्र होऊ शकत नाही . उपदेशास अधिकारी नसतो .त्याच्या मनात अनेक कल्पना ,संशय असतात .त्यामुळे मन मलीन झालेले असते .उपदेश घेण्यास अधिकारी नसतो .

तमोगुणी मंद ,विचारहीन ,कल्पनारहित ,पशुवत ,स्थूळ देहाचे सुख पाहणारी ,असतात .खाणे ,पिणे ,निजणे यापलीकडे त्यांचे चिंतन नसते .उपदेशाचा दुस-या प्रतीचा अधिकारी कारण त्याचे अंत:करण म्हणजे खुले मैदान !

No comments: