Friday, September 9, 2011

परब्रह्म व्यापक कसे ?

परब्रह्माची व्यापकता

प्राणी व्यापक मन व्यापक | पृथ्वी व्यापक तेज व्यापक | वायो आकाश तेज व्यापक | अंतरात्मा मूळमाया ||२०-१-१ ||
निर्गुण ब्रह्म ते व्यापक | ऐसे अवघेचि व्यापक | तरी हें सगट किं काये एक | भेद आहे ||२०-१-२ ||

प्राणी ,मन ,पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश ही पंचमहाभूते ,त्रिगुण ,अंतरात्मा मूळमाया ही सगळी व्यापक तत्वे आहेत .निर्गुण ब्रह्मही व्यापक आहे मग त्यात काही फरक आहे का ? असा प्रश्न श्रोते विचारतात .समर्थ उत्तर देतात :

शरीर पडे सामर्थ्यपाडे |प्राणी व्याप करी निवाडे | परी पाहांता मनायेव्ह्डे | चपळ नाही ||२०-१-६ ||

चपळपणा येकदेसी | पूर्ण व्यापकता पाहे त्यासी | पाहांता पृथ्वीच्या व्यापासी |सीमा आहे || २०-१-७ ||

तैसेची आप आणि तेज | अपूर्ण दिसती सहज | वायो चपळ समज |येकदेसी ||२०-१-८ ||

गगन आणि निरंजन | ते पूर्ण व्यापक सघन | कोणी येक अनुमान |तेथे असेचिना ||२०-१-९ ||

त्रिगुण गुणक्षोभिणी माया |माईक जाईल विलया | पूर्ण येकदेसी तया |व्यापकता नोहे ||२०-१-१० ||

प्राण्याचे शरीर लहानमोठे असल्याने ,शरीर सामर्थ्यही कमी जास्त असते .त्याचे शरीर स्थूल असते .,त्यामुळे ते मनाएव्हडे चपळ नाही ,चपळपणाव चंचळपणा एकदेशी असल्य्याने पूर्ण व्यापकता नसते .मनाच्या ,पृथ्वीच्या व्यापकतेला सीमा ,मर्यादा आहेत .म्हणून प्राणी ,मन ,पृथ्वी संपूर्ण व्यापक नाहीत .

आप ,तेज ही पूर्ण व्यापक नाहीत ,कारण अतिप्रचंड जलाशय असलेल्या सागरालाही मर्यादा आहेत .अग्नीलाही आपण मर्यादा घालतो तरच तो उपयोगी पडतो .वायू चपळ व चंचळ आहे .म्हणून तो एकदेशी आहे .आकाश व निरंजन पूर्ण व्यापक ,घनदाट आहेत पण आकाश ,जे त्रिगुण व माया यांपासून तयार झाले ,ते त्रिगुण आणि माया दोन्ही मायिक आहेत .नाशिवंत असणारी प्रत्येक वस्तू अपूर्ण व एकदेशी असते .त्याला पूर्ण व्यापकता नसते .म्हणून परब्रह्माची व्यापकता व बाकी कोणाचीही व्यापकता यात फरक आहे

No comments: