Wednesday, September 21, 2011

देवाचे स्वरुप

देवाचे स्वरूप कसे असते ? देवदर्शन करून घेण्याचा उपाय कोणता ?


श्रोते समर्थांना विचारतात ,महाराज देवाचे स्वरूप कसे असते ? ते कृपा करून सांगा .

समर्थ सांगायला सुरुवात करतात .

विचार पाहता तगेना | त्यास देव ऐसे म्हणवेना | परंतु जन राहवेना | काये करावे || २०-९-८ ||

विचाराने परीक्षण केले तर जे शाश्वत पणे टिकत नाही तो देव नाही .म्हणून

मृत्तिका पूजन करावे | आणि सवेचि विसर्जावे | हे मानावे स्वभावे | अंत:करणासी || २०-९-१ ||

देव पूजावा आणि टाकावा | हे प्रशस्त न वटे जीवा | याचा विचार पहावा | अंतर्यामी || २०-९-२

||

देव करिजे ऐसा नाही | देव टाकिजे ऐसा नाही | म्हणोनि याचा अर्थ | विचार पाहावा || २०-९-३

||

देव नाना शरीरे धरितो | धरुनी मागुती सोडितो | तरी तो देव कैसा आहे तो | विवेके वोळखावा

||२०-९-४ ||

मातीचा देव आणून त्याची पूजा करायची ,त्याचे विसर्जन करायचे हे मनाला पटत नाही .ज्या

देवाची पूजा करायची त्याला टाकून द्यायचे हे मनाला पटत नाही .कारण देव बनवता

येण्यासारखा नाही .तो टाकून देता येईल असाही नाही .देह धारण करणारा ,आणि सोडणारा

नाही .मग देव कसा आहे ते विवेकाने ओळखायला हवे .

देवदर्शन कसे करावे ?

देवदर्शन कसे करावे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात :

खोटे ते खोटेची खोटे | खं-यासी तगेनात वालटे | मन अधोमुख उफराटे | केले पाहिजे || २०-९-

१७ ||

अध्यात्मश्रवण करित जावे | म्हणिजे सकळ काही फावे | नाना प्रकारीचे गोवे | तुटोनी जाते ||

२०-९-१८ ||

सुत गुंतले ते उकलावे | तैसे मन उगवावे | मानत मानत घालावे | मुळाकडे || २०-९-१९ ||

सकळ काही कालवले | त्या सकळाचे सकळ जाले | शरीरी विभागले | सकळ काही || २०-९-२०

||

काय ते येथेचि पहावे | कैसे ते येथेचि शोधावे | सूक्ष्माची चौदा नावे | येथेचि समजावी || २०-

९-२१ ||

जे खोटे आहे ,मिथ्या आहे ,अशाश्वत आहे ,ते खोटेच आहे .जे खरे आहे ,शाश्वत ,अनादी आहे

अनंत आहे ,सत्य आहे ,ते खरेच रहाते .त्याच्यासमोर खोटे टिकत नाही .माणसाचे मन

खोट्यामध्ये दृश्यामध्ये गुंतलेले असते .ते मन दृश्यातून काढून सत्यात ,शाश्वतात गुंतवावे

लागते बहिर्मुख असलेल्या मनाला अंतर्मुख बनवावे लागते . बहिर्मुख म्हणजे दृश्याकडे

धावणा-या मनाला अंतर्मुख बनवायला हवे .म्हणजे आपल्या अंतरात्म्याकडे ,चैतन्याकडे

वळवायला हवे .अंतरात्म्याचा शोध घ्यायला हवा .त्यासाठी श्रवण ,मनन करायला हवे . सुताचा

गुंता जसा आपण उकलतो तसा मनाचा गुंता उकलायला हवा .मनाला हळू हळू मायेच्या

पसा-या बाहेर काढायला हवे .प्रपंच ,मुलेबाळे ,संपत्ती ,स्थावर ,यात गुंतून न पडता ,हळू हळू

त्यांच्यात राहून अलिप्तपणे वागायला शिकायला हवे .

आपला स्थूळ देह ,सूक्ष्म देह कोणत्या तत्वांचा बनला आहे ,ती तत्वे शाश्वत आहेत हे बघताना

त्यांचा निरास करता आला पाहिजे . ब्रह्मांड ज्या पंचमहाभूतांचे व त्रिगुणांचे मिश्रण आहे ,त्याच

मिश्रणाने आपला देहही बनला आहे .त्या मिश्रणात कोणती तत्वे आहेत ,ज्या तत्वांनी आपले

शरीर बनलेले आहे ते ओळखायला हवे .

पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश ह्या पंचभूतांनी व सत्व ,रज तम या त्रिगुणांनी अष्टधा प्रकृती

बनली आहे .ही अष्टधा प्रकृती आपल्या देहातही कशी सामावलेली आहे ,ते ओळखायला हवे .

आपल्या देहात पंचभूतांचे सबंधित असलेले विषय आढळतात .

पृथ्वी तत्व : हाडे ,मांस ,त्वचा ,नाडी ,रोम

आप तत्व : रेत ,रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम

तेज तत्व : भूक ,तहान ,आळस ,झोप ,मैथून

वायू तत्व : चळण ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन ,

आकाश तत्व : काम ,क्रोध ,शोक ,मोह ,भय

या विषयांनी आपल्या देहात पंचमहाभूते आढळतात .आपल्या शरीरात सत्व ,रज ,तम या

त्रिगुणांचे वास्तव्य असते ,पण या त्रिगुणांपैकी एक गुण प्राबल्य दाखवतो .म्हणजे पंचमहाभूते

व त्रिगुण आपल्या शरीरात असतातच .पण ही सगळी तत्वे अशाश्वत व नाशिवंत असतात .

स्थूळ देहाची २५ तत्वे असतात .

भूतपंचक : आकाश ,वायू ,तेज , आप ,पृथ्वी

विषयपंचक : शब्द ,स्पर्श ,रूप ,रस ,गंध

अंत:करण पंचक : अंत:करण ,मन ,बुद्धी ,चित्त ,अहंकार

प्राणपंचक : व्यान ,उदान ,समान ,अपान ,प्राण

पंचकर्मेंद्रिय : वाणी ,हात ,पाय ,जननेंद्रिय ,गुद

पंचज्ञानेंद्रिय : कान ,नाक ,त्वचा ,डोळे ,जीभ

या सर्व तत्वांकडे विवेकाने पाहिले तर कळते की ही सारी तत्वे नाशिवंत आहेत .अशाश्वत

आहेत .

स्थूल देहाची २५ तत्वे ,सूक्ष्म देहाची २५ तत्वे ,पंचमहाभूतांचे २५ विषय ,या सर्वांचा विचार केला

तर ही सर्व तत्वे मिथ्या ,अशाश्वत आहेत .म्हणजेच ही तत्वे मिळून बनलेला माझा देह

अशाश्वत आहे .

आता मूळमायेचे चौदा संकेत आपल्या देहात कसे आहेत ते बघायला समर्थ सांगतात .

मूळमाया संकल्परूप आहे .मनही संकल्प विकल्पांचे बनलेले आहे .म्हणजे मूळमाया मनाच्या

रूपाने आपल्या देहात आहे .

चैतन्य जे ब्रह्मांड चालवते ,तेच आपला देहही चालवते .म्हणजे संकल्प ,चैतन्य ,व अंत:करण

तीनही आपल्या शरीरात आहेत .

ज्या अवस्थेत गुण समान असतात ,त्याला गुणसाम्य म्हणतात .अष्टधा प्रकृती निर्माण होण्या

पूर्वी त्रिगुण समान होते .ती गुणसाम्य अवस्था असते .अशी गुणसाम्य अवस्था सूक्ष्म असते व

ती फक्त सिद्ध पुरुषच जाणू शकतो .

द्विधा दिसते शरीर | वामांग दक्षिणांग विचार | तोचि अर्धनारीनटेश्वर | पिंडी वोळखावा ||

२०-९-२५ ||

तोचि प्रकृतीपुरुष जाणिजे | शिवशक्ती वोळखिजे | षडगुणैश्वर बोलिजे | तया कर्दमासी ||

२०-९-२६ ||

आपल्या शरीराला डावा व उजवा असे दोन भाग आहेत .पण ते एकरूप आहेत .तेच आपल्या

पिंडात अर्धनारीनटेश्वर आहेत .अर्धनारी नटेश्वर तोच पिंडातला प्रकृती पुरुष आहे .तोच

शिवशक्ती आहे .तोच षड्गुनैश्वर आहे .आपल्या पिंडात असणारे त्रिगुण गुप्त रुपाने वास करत

असतात .तेच महत्तत्व असते .

अर्धमात्रा ,शुध्द तत्व ,गुणक्षोभिणी ही एकाच मूळ तत्वांची नावे आहेत .

मन ,माया ,जीव या तीनही या शरीराचा स्वभाव आहे . अशा प्रकारे मूळमायेच्या १४ नावांचा

संकेत आपल्या शरीरातच पहायला मिळतो .

पिंड पडता अवघेचि जाते | परंतु परब्रह्म राहाते | शाश्वत समजोन मग ते | दृढ धरावे ||

२०-९-३० ||

पिंड पडला की सगळे जाते .पण परब्रह्म तेव्हडे रहाते .ते शाश्वत आहे ,असे समजून घट्ट धरून

ठेवावे .आणि देवदर्शन करून घ्यावे .असे श्री समर्थ सांगतात .

No comments: