Tuesday, June 8, 2010

भ्रम निरूपण

पंचप्रलय सांगताना समर्थांनी विवेकप्रलय सांगितला .विवेकप्रलय म्हणजे अज्ञानप्रलय .अज्ञानप्रलय म्हणजे भ्रमप्रलय ! भ्रमप्रलय समजण्यासाठी आधी भ्रमाची व्याख्या समजावून घेतली पाहिजे .भ्रमाची व्याख्या सांगताना समर्थ म्हणतात :
येक परब्रह्म संचलेकदापि नाही विकारिलेत्यावेगळे भासलेते भ्रमरूप। । १०--। ।
परब्रह्म एकच एक सदवस्तू सगळीकडे भरून राहिली आहे .तिच्यामध्ये कोणताही विकार होत नाही किंवा बदल होत नाही .तसा अनुभव येता अन्य जे अनुभवाला येते तो सारा भ्रम आहे .भ्रम म्हणजे हिंडणे ,भटकणे,गोंधळणे,चूक करणे .इंद्रिय ,मन ,बुध्दी ,अहंता ,कल्पना यावर मोहाचे पटल येते .मी देहच आहे अशी खोटी समजूत माणूस करून घेतो .तोच भ्रम !
ज्या ज्या गोष्टींना ,वस्तूंना ,अनुभवांना प्रलयकाली ,आज ना उद्या अंत आहे त्या सगळ्या गोष्टी भ्रमात
मोडतात .पंचमहाभूते त्रिगुण ,मी तू ,देव भक्त ,उपासना ईश्वर सगळे भ्रमरूप आहेत .दिसणारे ,खरे वाटणारे दृश्य विश्व ही भ्रम आहे .हे भ्रमाचे मूळ तात्विक रूप !
प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला भ्रम अनुभवायला मिळतो .अज्ञातप्रांतात आपण वाट चुकतो ,दिशाभूल
होते ,निकटच्या प्रेमाच्या माणसांची ओळख विसरते .,अंमली पदार्थ खाण्याने ,प्यायल्याने भलतेच
दिसते ,भूतबाधा झाल्यासारखी वाटते .दशावताराच्या नाटकात काम करणा-या बायका -या वाटतात .मनात संशय बळावतो ,वस्तू ज्या ठिकाणी ठेवली ती जागा विसरते ,रस्त्याने जाताना वाट चुकते,वस्तू स्वत :पाशी असून ती हरवली आहे असे वाटते .वस्तू विसरणे,शिकलेली कला किंवा विद्या विसरणे हे सर्व म्हणजे भ्रमच !
अशुभ चिन्हे बघून ,अपशकून झालेला पाहून मन अस्वस्थ होणे ,एखादे झाड किंवा लाकूड बघून त्याला भूत समजणे,समोर असणारे पाणी काच समजणे ,एक असता भलतेच वाटणे,मेलेले माणूस जेवायला येते असे
वाटणे ,हा सगळा भ्रम आहे .हे सगळे मिथ्या आहे असे तोंडाने म्हणणे पण मनातून ऐश्वर्य अधिकाराची लालसा धरणे,ज्ञानी असून वैभवाने दिपणे ,कर्मठपणामुळे ज्ञानाची नावड होणे ,कर्मठपणाचा सनातनीपणा ज्ञातेपणाचा बेछुटपणा असणे,देह कर्म ,जात ,कुळ,ज्ञान ,मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान ,दृश्या बद्दल धरलेला अभिमान हा सर्व भ्रम ! समर्थ म्हणतात :
भ्रमरूप विश्व स्वभावेतेथे काये म्हणोन सांगावेनिर्गुण ब्रह्मावेगळे अघवेभ्रमरूप । । १०--३६ । ।
एका निर्गुण ब्रह्माशिवाय बाकीचे सगळे भ्रमरूप आहे . देह ठेवलेल्या ज्ञानी पुरुषाचे चमत्कार सुध्दा भ्रमच!

No comments: