Wednesday, June 9, 2010

निष्काम सगुणोंपासना का करावी ?

अनेक पुरश्चरणे करणे,अनेक तीर्थ हिंडणे,प्रबळ वैराग्य धारण करणे ,अशा अनेक प्रकारच्या शक्ती अंगी
बाणणे ,म्हणजे पुण्यमार्ग अवलंबणे असे समर्थ म्हणतात .मी आत्मस्वरूप आहे अशा निश्चयाने ज्ञानमार्ग साधतो सामर्थ्यही चढते,पण एक सद्गुरु किंवा देव या दोघांपैकी एकावर संपूर्ण निष्ठा असायला हवी.एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला म्हणून सगुणाची उपासना सोडली म्हणजे सद्गुरुची किंवा देवाची उपासना सोडली तर निर्गुणही स्वाधीन होत नाही आणि सगुणही हाताशी लागत नाही .
नाही भक्ती नाही ज्ञानमध्येच पैसावला अभिमानम्हणौनिया जपध्यानसांडूच नये। । १०--१७ । ।
भक्ती नसेल तर ज्ञानही नसते पण अभिमान मात्र येतो .म्हणून समर्थ सांगतात की जप ध्यान सोडू नये .
सांडील सगुणभजनासीजरी तो ज्ञाता परी तो अपेसीम्हणौनिया सगुण भजनासीसांडूचि नये । । १०- -१८

जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडतो ,तो ज्ञानी पण अपयशी ठरतो .म्हणून सगुणाची उपासना सोडू नये .जो कोणी ज्ञानाची ,कलेची ,विद्येची ,विज्ञानाची ,भगवंताची उपासना निष्काम भावनेने करू लागतो तेव्हा ती उपासना शुध्द पवित्र बनते.तिच्यात सामर्थ्य उत्पन्न होते .तेव्हाच ते जगाच्या उध्दारासाठी उपयोगी पडते.ज्ञाता ज्यावेळेस उपासना करत नाही तेव्हा त्याच्या जवळ सामर्थ्य निर्माण होत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
नि :काम बुध्दीचिया भजनात्रैलोकी नाही तुळणासमर्थेविण घडेनानि ;काम भजन । । १०- -१९ । ।
कामनेने फळ घडेनि :काम भजने भगवंत जोडेफळ भगवंता कोणीकडेमहदानंतर । । १०--२० । ।
निष्काम बुध्दीने म्हणजे अपेक्षा ठेवता जेव्हा भगवंताची उपासना घडते ती अनमोल असते .तिची बरोबरी कोणी करू शकत नाही .समर्थेविण घडेनायाचा अर्थ प्रबळ आत्मबळ असणारी व्यक्तीच फक्त नि :काम भजन ,
नि :स्वार्थी भजन करू शकते .
आपेक्षा ठेवून उपासना केली तर अपेक्षा पूर्ण होते पण आपेक्षा ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते .भगवंत आपलासा होतो .पण आपेक्षा पूर्ण होणे प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती यात खूपच फरक आहे .
नाना फळे देवापासीआणि फळ अंतरी भगवंतासीयाकारणे परमेश्वरासीनि :काम भजावे । । १०- -२१ । ।
आपल्या आपेक्षा ,वासना पूर्ण करण्याचे सामर्थ्य भगवंताकडे असते .पण आपण भगवंताकडे काही मागता कामा नये कारण आपले मागणे पूर्ण होते पण भगवंत आपल्या पासून दूर जातो .नि :काम उपासनेने कोणते फळ मिळते ते समर्थ सांगतात ;
नि :काम भजनाचे फळ आगळेसामर्थ्य चढे मर्यादेवेगळेतेथे बापुडी फळेकोणीकडे । । १०--२२ । ।
भक्ते जे मनी धरावेते देवे आपणचि करावेतेथे वेगळे भावावेनलगे कदा । । १०--२३ । ।
दोनी सामर्थ्ये येक होताकाळास नाटोपे सर्वथातेथे इतरांची कोण कथाकीटक न्याये। । १०--२४ । ।
म्हणो नि :काम भजनवरी विशेष ब्रह्मज्ञानतयास तुळिता त्रिभुवनउणे वाटे। । १०--२५ । ।
नि :काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य असते .त्यामुळे तो वाटेल ते करू शकतो .भक्ताच्या मनात आलेला कोणताही संकल्प भगवंत आपण सिध्दीला नेतो .आत्मज्ञान भगवंताची भक्ती या दोन गोष्टी मिळून ज्ञानी भक्ता पुढे काळही काही करू शकत नाही .म्हणजे निष्काम उपासना ब्रह्मज्ञान असा योग जेव्हा एखाद्या ज्ञात्यामध्ये असतो तेव्हा त्रिभुवन उणे पडते .त्याचा प्रताप ,यश ,कीर्ती दिवसां दिवस वाढत जातात .

No comments: