Wednesday, June 9, 2010

संताच्या अस्तित्वाची प्रचिती का येते ?

विवेक प्रलय सांगून झाल्यावर समर्थ सांगतात :
ज्ञात्यास नाही संसारऐसे बोलती अपारगत ज्ञात्याचे चमत्कारया नाव भ्रम । । १०--३७ । ।
येथे आशंका उठिलीज्ञात्याची समाधी पूजिलीतेथे काही प्रचित आलीकिंवा नाही । । १०--३८ । ।
तैसेचि अवतारी संपलेत्यांचेही सामर्थ्य उदंड चालेतरी ते काय गुंतलेवासना धरुनि । । १०--३९ । ।
आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाही .तरी दे ठेवलेल्या पुरुषाचे चमत्कार सांगतात हा भ्रम आहे .आपण ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्याच्या अस्तित्वाची प्रचिती येते नाही ?पूर्वी होउन गेलेल्या अवतारी पुरुषांचे सामर्थ्य जर अनुभवाला येते तर अंतकाळी त्यांची वासना राहिली असे होते का ?ते तेथे गुंतून पडतात का ?
ह्या प्रश्नांचे उत्तर समर्थ दशक १० समास मध्ये देतात :
ज्ञानी मुक्त होउन गेलेमागे त्यांचे सामर्थ्य चालेपरंतु ते नाही आलेवासना धरूनी । । १०-- । ।
ज्ञानी पुरुष जेव्हा देहाने जिवंत असतात तेव्हा ते संसारात असेल तरी ते मनाने अलिप्त असतात .ते आत्मज्ञानी असतात .ते परब्रह्माशी लीन असतात .मग ईश्वराचे ज्ञान ,प्रेम ,सामर्थ्य हे त्या आत्मज्ञानी पुरुषाचे बनते.ईश्वरस्वरुप झाल्याने ईश्वराची कृपा ही त्यांची कृपा बनते .त्यांना अज्ञानी जीवांबद्दल उत्कट प्रेम ,त्यांच्या कल्याणाची तळमळ असते .ज्या जागी ते जिवंतपणी असतात त्यांचे विचार सूक्ष्म तरंगरूपाने तेथेच
वावरतात .समाधी बांधल्यावर तो सत्पुरुष तेथे आहे अशी लोकांची भावना असते .सत्पुरुष खरोखरीच सर्व व्यापी असतो .त्याच्या विचार तरंगाचा समूह समाधी जवळ कायम वास करत असतो .जेव्हा पारमार्थिक दृष्टया लवचिक व्यक्ती समाधीच्या दर्शनाला येते तेव्हा विचार तरंग त्या माणसाच्या सूक्ष्म देहाचा भेद करतात .त्या वेळेस त्या माणसाला संताच्या अस्तित्वाची प्रचिती येते .

No comments: