Wednesday, June 2, 2010

सगळयांचा अंतरात्मा एक कसा ?

सकळांचे अंत:करण येककिंवा येक नव्हे अनेकऐसे हे निश्चयात्मकमज निरोपावे । । १०-- । ।
शिष्याने प्रश्न विचारला की सगळयांचे अंत :करण एक असते की अनेक हे मला निश्चयात्मक सांगा .तेव्हा समर्थ उत्तर देतात की सर्वांचे अंत :करण एकच आहे असा माझा अनुभव आहे .
तेव्हा श्रोता प्रश्न विचारतो की जर सर्वांचे अंत :करण एकच असेल तर एकाचे अंत :करण दुस-याच्या
अंत :करणाशी समरस कसे होत नाही ?एक जेवला की सर्वांची पोटे का भरत नाहीत ?एक आनंदला की सर्वांना आनंद का होत नाही ?एक शांत झाला तर सगळे शांत का होत नाहीत ?एक सुखी असला तर दुसरा दु:खी का असतो ?सर्वांचे मतैक्य का होत नाही ?त्यामुळे सर्वांचे अंत :करण एक आहे हे पटत नाही .या प्रश्नाला समर्थ उत्तर देताना म्हणतात :
अंत :करण म्हणिजे जाणीवजाणीव जाणता स्वभावदेहरक्षणाचा उपायजाणती कळा। । १०--१२ । ।
जाणीव म्हणजे आहेपणाचे भान !जाणीव म्हणजे जाणण्याची नैसर्गिक शक्ती !जाणण्याच्या शक्तीनेच सर्वांना देहरक्षणाचे उपाय सुचतात .सर्प प्राणी समोरासमोर येतात तेव्हा जाणीवेच्या प्रेरणेने सर्प दंश
करतो ,जाणीवेने प्राणी सर्पापासून दूर पळतो. दोघांमध्ये देहरक्षण ही एकच जाणीव आहे .दोघांची प्रेरणा सारखीच आहे .म्हणजे दोघांचे अंत :करण सामान आहे .एक आहे .
डोळ्यांनी पहाणे ,जीभेने चाखणे,कानाने ऐकणे,त्वचेने स्पर्श करणे,नाकाने वास घेणे ,या सर्वांची प्रचिती सर्व प्राणीमात्रात सारखीच असते .सर्व प्राणीमात्रांचे अंत :करण एकच असते .
एखाद्या गोष्टीने एखादा सुखी होतो तर दुसरा दु :खी होतो .ते त्याच्या देह्स्वभावावर अवलंबून असते .पण ते
अंत :करणा मुळे समजते . समर्थ म्हणतात :
आवडे नावडे ऐसे झालेतरी ते देह्स्वभावावरी गेलेपरंतु हे कळो आलेअंत :करणयोगे । । १०--१९ । ।
पाणी सर्वांना गारच लागते ,अग्नी उष्ण वाटतो ,म्हणजे सर्वांचे अंत :करण एकच असते .
जाणो जीव चारा घेतीजाणो भिती लपतीजाणोनिया पळोन जातीप्राणीमात्र । । १०--२२ । ।
किडामुंगीपासून ब्रह्मादिकसमस्तांस अंत :कर्ण येकये गोष्टीचे कौतुकप्रत्यें जाणावे । । १०--२३ । ।
या विश्वाचा पालन कर्ता विष्णू आहे ते समर्थ सांगतात :
जाणीव म्हणिजे अंत :करणअंत :करण विष्णूचा अंश जाण
विष्णू करितो पालनयेणे प्रकारे । । १० --२६ । ।

No comments: