Thursday, April 1, 2010

दुश्चित्तपणा म्हणजे काय ?

दुश्चित्तपणा मुळे काय घडते ?
व्यग्र चित्ताला समर्थ दुश्चित्तपणा म्हणतात .दुश्चित्तपणा ,आळस ,निद्रा ही त्रयी भ्रष्ट करणारी त्रयी आहे असे समर्थ म्हणतात .मनाचा अस्थिरपणा ,श्रध्दाहीनपणा,श्रम करण्याचा कंटाळा,लक्ष हीनपणा ,विचारात घोटाळा या सर्व गोष्टी दुश्चित्तपणात दाखवल्या जातात .समर्थ सांगतात :
तरी तो ऐसा नव्हे पाषाण तो अपवित्र नि:कारण तयासारिखा देह जाण दुश्चित्त अभक्तांचा - -१८
आता असो हे बोलणे घात होतो दुश्चित्तपणे दुश्चित्तपणाचेनि गुणे प्रपंच ना परमार्थ - -१९
दुश्चित्तपणे कार्य नासे दुश्चित्त पणे चिंता वसे दुश्चित्त पणे स्मरण नसे क्षण येक पाहातां - -२०
दुश्चित्तपणे शत्रु जिणे दुश्चित्तपणे जन्ममरणेदुश्चित्तपणाचे नि योगेहानी होये। । - -२१ । ।
दुश्चित्तपणे नव्हे साधनदुश्चित्तपणे घडे भजनदुश्चित्तपणे नव्हे ज्ञानसाधकांसी । । - -२२ । ।
दुश्चित्तपणे नव्हे निश्चयोदुश्चित्तपणे घडे जयोदुश्चित्तपणे होये क्षयोआपुल्या स्वहिताचा । । - -२३ । ।
दुश्चित्तपणे घडे श्रवणदुश्चित्तपणे घडे विवरणदुश्चित्तपणे निरूपणहातीचे जाये । । - -२४ । ।
वेडे पिशाच्य निरंतरअंध मुके आणि बधिरतैसा जाणावा संसारदुश्चित्त प्राणियांचा। । --२५ । ।
दुश्चित्त बैसलाचि दिसेपरी तो असतची नसेचंचळ चक्री पडिले असेमानस तयाचे । । - -२६ । ।
सावध असोन उमजेनाश्रवण असोन ऐकेनाज्ञान असोन कळेनासारासार विचार । । - -२७ । ।
दुश्चित्त पणा मुळे माणसाचा घात होतो .प्रपंच परमार्थ दोन्ही घडत नाही .कार्याचा नाश तर होतोच त्याशिवाय सदैव काळजी वाटते ,कोणत्याही गोष्टीचे स्मरण रहात नाही ,जीवन नकोसे होते ,जन्ममरणाच्या फे -या माराव्या लागतात .भजन घडत नाही ,साधना होत नाही ,भजन घडत नाही ,आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही .मनाचा निश्चय होत नाही .आत्महिताचा क्षय होतो .दुश्चित्तमाणूस एका ठिकाणी बसलेला असला तरी त्याचे मन कोठेतरी भटकत असते .त्यामुळे एखाद्या वेडयाचा,पिशाच्च बाधा झालेल्या माणसाचा ,आंधळया माणसाच्या संसारा प्रमाणे कळाहीन संसार असतो .आपल्याला वाटते तो क्ष देतो असे वाटते पण त्याचे क्ष नसते ,ऐकतो असे वाटते पण त्याला आकलन होत नाही .ज्ञान आहे असे वाटते पण खरे काय आणि खोटे काय हे त्याला कळत नाही .
दुश्चित्तपणा बरोबर जर आळस असेल तर जिवीत वायाच जाते . कारण समर्थ आळसाबद्दल म्हणतात :
आळसे राहिला विचारआळसे बुडाला आचारआळसे नव्हे पाठांतरकाही केल्या- -३० । ।
आळसे घडेना श्रवणआळसे नव्हे निरूपणआळसे परमार्थाची खूणमळिण जाली । । - -३१ । ।
आळसे नित्यनेम राहिलाआळसे अभ्यास बुडालाआळसे आळस वाढलाअसंभाव्य । । - -३२ । ।
आळसे गेली धारणा धृतीआळसे मळिण जाली वृत्तीआळसे विवेकाची मतीमंद जाली । । - -३३ । ।
आळसे निद्रा वाढलीआळसे वासना विस्तारलीआळसे सुन्याकार जालीसद्बुध्दी निश्चयाची । । - -३४ । ।
दुश्चित्तपणासवे आळसआळसे निद्राविळासनिद्राविळासे केवळ नासआयुष्याचा । । - -३५ । ।
आळसाने विचार करता येत नाही .आळसाने आचार सुटतो ,पाठांतर होत नाही ,श्रवण घडत नाही ,निरूपण ऐकायचा कंटाळा येतो ,परमार्थ बुडतो .आळसाने धारणशक्ती कमी होते ,मनाला अधीरता येते ,विवेक
नाहीसा होतो . आळसाने निद्रा ,झोप वाढते ,वासना अमर्याद वाढते ,निश्चय पार पाडला जात नाही .थोडक्यात आळसाने झोप ,झोपेने आयुष्याचा नाश होतो .
म्हणूनच समर्थ म्हणतात :
निद्रा आळस दुश्चितपणहेचि मूर्खाचे लक्षणयेणेकरिता निरूपणउमजेचिना । । - -३६ । ।


No comments: