Friday, April 23, 2010

प्रत्येकाचा अनुभव वेगळा!

जनाचे अनुभव पुसता कळहो उठिला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा -१० -
जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो ,तो काय आणि कोणत्या स्थितीत लोक राहतात असा प्रश्न श्रोते समर्थांना विचारतात .समर्थ सांगतात :
एक म्हणतो आपण संसारच करावा .संसार पार करत करत त्यातून [भवसागरातून ] पार पाडावे .दूसरा म्हणतो -संसार कसा सहजपणे सुखाने व्हायला हवा .पण त्यामुळे सद्गति प्राप्त होणार नाही .सद्गति मिळावी म्हणून काही दान पुण्य करावे .
एक म्हणतो संसार खोटा आहे मग तो कशाला करावा .सरळ वैराग्य धारण करून करून देशांतराला जावे .वैराग्याने स्वर्ग प्राप्ती तरी होइल .
एक म्हणतो आपले घर सोडून कोठे जाणार ?उगाचच पायपीट होइल .आपला गृहस्थाश्रम सांभाळून असावे .
एक म्हणतो धर्म वगैरे काही नाही .सगळीकड़े अधर्म बोकाळला आहे .प्रत्येकाला चांगली वाईट कामे करावीच लागतात .
एक म्हणतो वासना शुध्द ठेवायला हवी,म्हणजे माणूस विनासायास संसार तरतो .
एक म्हणतो संसार तरायला हवा असेल तर भगवंतावर निष्ठा ठेवायला हवी .
एक म्हणतो आई बाबांना मनापासून देव मानावे ,त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांची पूजा करावी .
एक म्हणतो शास्त्रात सांगितल्या प्रमाणे वागले की परलोक प्राप्त होतो .
एक जण म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास एका जन्मात होणारा नाही .त्यापेक्षा साधूंना शरण जावे
एक म्हणतो या सर्वांपेक्षा अंत:करणात भूतदया ठेवावी
एक म्हणतो आपल्या आचार धर्माने वागावे ..अंतकाळी भगवंताचे नाम घ्यावे .नाहीतर अंतकाळी माणसाला भ्रम होतो .
एक म्हणतो तीर्थाटन करावे .एक म्हणतो तीर्थाटनात पाणी आणि पाषाण बघायचे .एक म्हणतो तीर्थाच्या दर्शनाने मोठ्या पापांची होळी होते .
एक म्हणतो मन आवरणे सगळ्या साधनांचा हेतू आहे .मग मनच आवरावे .
एक म्हणतो योगसाधन करावे .ते उत्तम आहे .त्याने देह अमर करावा
एक म्हणतो भक्तिमार्ग धरावा .एक म्हणतो ज्ञानमार्ग सर्वात उत्तम .साधना करावी .एक म्हणतो मुक्तपणे
वागावे .एक म्हणतो स्वैर वागताना पापाचा कंटाळा करावा .एक म्हणतो कोणाची निंदा करू नये.दुष्टांची संगत सोडावी .ज्याचे अन्न खातो त्याच्या चाकरीत त्याच्या समोर देह ठेवावा .त्याने मोक्षपद मिळते.
एक म्हणतो आधी खायला व्यवस्थित मिळवावं मग बाकीच्या गोष्टी !
एक म्हणतो खूप तप:श्चर्या करून तप साठवावे,त्याने सर्व सिध्दी वश होतात .
एक म्हणतो मंत्रतंत्राचा अभ्यास करून वेताळ प्रसन्न करून घ्यावा .एक म्हणतो अघोर मंत्र साध्य
करून घ्यावा .एक म्हणतो मृत्यृंजयाचा जप करावा .
अशी अनेक मते समर्थानी दशक समास १० मध्ये मांडली

No comments: