Thursday, April 22, 2010

सिध्द लक्षण

सिध्दाची लक्षणे सांगावी अशी श्रोत्यांनी विनंती केली त्याचे उत्तर समर्थ देतात :
ऐक सिध्दांचे लक्षणसिध्द म्हणिजे स्वरुप जाणतेथे पाहातां वेगळेपणमुळीच नाही । । - - । ।
स्वरुप होऊन राहिजेतया नाव सिध्द बोलिजेसिध्द स्वरूपीच साजेसिध्द्पण। । - - । ।
रात्रंदिवस जेव्हा साधक आत्मस्वरूपाचे ध्यान चिंतन जेव्हा करतो तेव्हा साधकाचे मन त्या स्वरूपाने आतबाहेर भरून जाते .अत्यंत सूक्ष्म बनते.मनात आमूलाग्र बदल होतो .मन उन्मन होते .मी ,तू ,देव भक्त हा द्वैतभाव
उरत नाही .त्यामुळे विश्वातले द्वैत ,भेद ,दृश्य वस्तू दिसत असूनही त्यात आत्मस्वरूप दिसते .त्याच्या अनुभवास फक्त आत्मस्वरूपाचे ज्ञान होते .सर्व भूतमात्रात आपणच आत्मरूपाने भरून असा प्रत्यय येतो .
सदा स्वरूपानुसंधानहे मुख्य साधूचे लक्षणजनी असोन आपणजनावेगळा। । - - । ।
स्वरूपानुसंधानात सिध्द असतो .तुकाराम महाराज जसे सतत ईश्वरचिंतनात मग्न असत ,जनात असूनही जनावेगळे असत .ते रोजची कामे करत पण मन मात्र स्वरूपानुसंधानात !
स्वरूपी दृष्टी पडतातुटोनि गेली संसार चिंतापुढे लागली ममतानिरूपणाची। । - -१० । ।
आत्मस्वरूपाची सतत अनुसंधान असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना संसाराची चिंता कधीच नव्हती .म्हणून मिळालेली ऊसाची मोळी त्यांनी मुलांना वाटून टाकली . एक ऊस घेऊन घरी आले .
बाह्य साधकाचे परीआणि स्वरूपाकार अंतरीसिध्द लक्षण चतुरीजाणिजे ऐसे । । - -१२ । ।
सिध्द बाहेरून दिसायला साधका सारखा दिसतो ,पण आतून आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला असतो .
संदेहरहित साधनतेचि सिध्दांचे क्षणअंतरबाह्य समाधानचळेना ऐसे । । - - १३ । ।
सिध्द जी साधना करतो ती संदेह रहित असते .म्हणजे आपण करतो ती साधना योग्य आहे की नाही ,ती साधना योग्य फळ देइल की नाही ,कोणत्या मार्गाने साधना करावी अशी कोणतीच शंका सिध्दाच्या मनात येत नाही .तेच सिध्दाचे क्षण आहे . त्याच मुळे साधनेने तो निर्दोष ,निर्मम ,नि :स्वार्थ ,निष्काम ,निर्मल ,सम ,अत्यंत पवित्र अंत:करणाचा होतो .त्यामुळे कधीही भंग पावणारे आतील बाहेरील समाधान त्याच्याजवळ असते .
अचळ जाली अंतरस्थितीतेथे चळणास कैसी गतीस्वरूपी लागता वृतीस्वरूपचि जाली । । - -१४ । ।
सिध्दाची अंतरस्थिती अचळ होते .सुख दु:खे समे कृत्वाअशी त्याची अवस्था असते .सुख दु: काहीही भोगावे लागले तरी मन विचलित होत नाही .सुखाने हुरळू जात नाही ,की दु :खाने कोलमडून पडत नाही .त्याच्या मनाची अवस्था अशी सम असते .त्यामुळे आत्मस्वरूपावरील त्याची एकाग्रता ढळत नाही .वृती स्वरूपाकार होते
स्वरूपी स्वरुपचि जालामग तो पडोनिच राहिलाअथवा उठोनि पळालातरी चळेना । । --१६ । ।
तो स्वस्वरूपात विलीन झालेला असल्याने स्वरूपाकारच असतो ,स्थिरच असतो .त्यामुळे तो एके ठिकाणी पडून राहिला किंवा उठून चालू लागला तरी अन्तर्यामी स्थिर असतो .
येथे कारण अंतरस्थितीअंतरीच पाहिजे निवृत्तीअंतर लागले भगवंतीतोचि साधू । । - -१७ । ।
सिध्दावस्था प्राप्त होण्याचे मुख्य कारण असते त्याची अंतरस्थिती !तो अंतरातून सुटलेला असतो ,निवृत्त झालेला असतो .म्हणजे त्याच्या मनात कोणत्याही आशा ,आकांक्षा ,लोभ ,मोह ,आसक्ती ,नसते .सुख दु :खाच्या घटनांशी त्याला देणघेण नसते .त्यामुळेच त्याचे मन भगवंताशी एकरूप झालेले असते ,भगवंतच त्याच्या ह्रुदयात राहिलेला असतो .तोच साधू असतो .

No comments: