Sunday, April 25, 2010

ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने,का केले ?

ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने करताना परब्रह्माची बेचाळीस लक्षणे सांगितली आहेत .परब्रह्म अतींद्रिय आहे .तेथे
बुध्दी ,वाणी इंद्रियांना प्रवेश नाही .आणि ब्रह्माचे साम्राज्य अनन्यतेचे किंवा अद्वैताचे !बुध्दीचे साम्राज्य असते वेगळे पणाचे किंवा द्वैताचे असते म्हणून ज्ञानी संत अज्ञानाला ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात .तेव्हा ब्रह्म असे नाही तसे नाही असे वर्णन करावे लागते .तसेच' नाही ' म्हणून वर्णन करताना समर्थ सांगतात :
ब्रह्माला आकार नाही म्हणजे निराकार आहे ,आधार नाही म्हणजे निराधार आहे ,त्याचे जवळ कल्पना नाही म्हणजे निर्विकल्प आहे .जळमय नाही म्हणजे निरामय आहे .त्याचेकडे भास् नाही म्हणजे निराभास
आहे ,अवयव नाहीत म्हणजे निरावयव आहे ,प्रपंच नाही म्हणजे नि :प्रपंच आहे ,कलंक नाही म्हणजे
नि :कलंक ,उपाधी नाही म्हणजे निरोपाधी ,उपमा नाही म्हणजे निरोपम्य ,अवलंबन नाही म्हणजे
निरालंब ,अपेक्षा नाही म्हणजे निरापेक्ष ,जनची नाही म्हणजे निरंजन ,अंतर नाही म्हणजे निरंतर ,गुण नाही म्हणजे निर्गुण ,संग नाही म्हणजे नि:संग ,मळ नाही म्हणजे निर्मळ,चळन नाही म्हणजे निश्चळ,शब्द नाहीत म्हणजे नि :शब्द ,दोष नाहीत म्हणजे निर्दोष ,वृत्ती नाही म्हणजे निवृत्त ,काम नाही म्हणजे नि :काम ,लेप नाही म्हणजे निर्लेप ,कर्म नाही म्हणजे नि :कर्म ,नाम नाही म्हणजे अनाम्य,जन्म नाही म्हणजे अजन्मा ,प्रत्यक्ष नाही म्हणजे अप्रत्यक्ष ,गणीत नाही म्हणजे मोजमाप करता येत नाही म्हणजे अगणीत ,कर्तव्यता नाही म्हणजे अकर्तव्य ,क्ष नाही म्हणजे क्ष ,रूप नाही म्हणजे अरूप ,क्ष नाही म्हणजे मनाला आकलन होत नाही ,अंत नाही म्हणजे अनंत ,पार नाही म्हणजे अपार ,ढळ नाही म्हणजे अढळ म्हणजे आपल्या स्थानापासून भ्रष्ट होत नाही ,द्वैत नाही म्हणजे अद्वैत ,दृश्य नाही म्हणजे अदृश्य ,च्युत नाही म्हणजे स्थानावरून घसरत नाही म्हणजे अच्युत ,तोड़ता येत नाही म्हणजे अछेद ,जाळता येत नाही म्हणजे अदाह्य ,पाण्याने भिजत नाही म्हणजे अक्लेद !
म्हणजेच परब्रह्म दृश्य विश्वाच्या पलिकडे आहे .त्याच्या सारखे दुसरे कोणी नाही .दुसरे काही त्याच्या
सारखे नाही .दृश्य खरे असे मानण्या-या अज्ञानी माणसांना दृश्य वस्तूंची ,संबंधांची ,कल्पनांची भाषा कळते.त्या
वस्तूंचा ,संबंधांचा ,कल्पनां चा परब्रह्माशी संबंध जोडून परब्रह्म असे नाही ,तसे नाही असे सांगावे लागते .

No comments: