Thursday, April 8, 2010

आकाशाला ब्रह्म का म्हणू नये?

आकाशा ऐसे नाही सारआकाश सकळांहून थोरपाहाता आकाशाचा विचारस्वरूपा सारिखा । । - -३६। ।
तव शिष्ये केला क्षेदोहींचे सारखेचि स्वरुपतरी आकाशचि स्वरुपकां म्हणो नये । । - -३७ । ।
आकाश स्वरूपा कोण भेदपाहातां दिसती अभेदआकाश वस्तूचि स्वतसिध्दकां म्हणावी । । - -३८ । ।
आकाश अति सूक्ष्म , अति विशाल आहे ,तसे स्वस्वरू ही [परब्रह्म ] अति सूक्ष्म अति विशाल आहे .मग शिष्य शंका विचारतो ,'आकाश हेच ब्रह्म का म्हणू नये ?आकाश ब्रह्म यात काय भेद आहे ?दोघांमध्ये अभेद दिसतो मग आकाश स्वत: सिध्द ब्रह्म का म्हणू नये ?
समर्थ उत्तर देतात :
ऐकोनि वक्ता बोले वचनवस्तू निर्गुण पुरातनआकाशाआंगी सप्त गुणशास्त्री निरोपिले । । - -४० । ।
काम क्रोध शोक मोहोभय अज्ञान सुन्यत्व पाहोऐसा सप्तविध स्वभावआकाशाचा । । - -४१ । ।
ब्रह्मवस्तू निर्गुण ,निराकार ,सनातन ,कायम टिकणारी आहे ,तर आकाशात काम ,क्रोध ,शोक मोह ,भय ,
अज्ञान ,शून्यपणा हे सात प्रकाराचे गुण आकाशाचे स्वभाव धर्म आहेत .त्यामुळे आकाश पंचमहाभूतातील एक भूत आहे .
ऐसे शास्त्राकारे बोलिलेम्हणौनि आकाश भूत जालेस्वरुप निर्विकार संचलेउपमेरहित । । - -४२। ।
याउलट ब्रह्मस्वरुप निर्विकार आहे ,सगळीकड़े अविकारीपणाने गच्च भरलेले आहे .ब्रह्मवस्तू कोणी
बनवलेली नाही ,स्वत:सिध्द आहे ,म्हणून सनातन आहे .तर आकाश गुणमाये पासून बनलेल्या तमोगुणाची निर्मिती आहे .प्रलयकाली नष्ट होणारे आहे .म्हणून सनातन नाही .
परब्रह्म कल्पने पलिकडे आहे ,तर्कातीत आहे .त्यामुळे ते नाही या स्वरूपात सांगावे लागते .त्यात गुण ,विकार नाहीत .ते इंद्रियातीत आहे तर आकाश इंद्रियांना भासते ,आहेपणे सांगता येते .त्यामुळे आकाश व्यापक निश्चळ असले तरी ते ब्रह्म होऊ शकत नाही .
आकाश ब्रह्म एकच नाहेत हे समजावून सांगताना समर्थांनी रोजच्या व्यवहारातील उदाहरणे दिली
आहेत .तांदुळाच्या आकाराचे खड़े तादुळ एकच नसतात ,सोने सोनपितळ एकच नसते तसे आकाश आणि वस्तू एकच नसते .कारण :
वस्तूसी वर्णचि नसेआकाश श्यामवर्ण असेदोहीं साम्यता कैसेकरिती विचक्षण । । - -५० । ।
रंग असणे हा गुण इंद्रीयांवर अवलंबून असतो .आकाश नीलवर्णी आहे ब्रह्मवस्तू अतींद्रिय आहे .शब्द ,स्पर्श ,
रस ,रूप गंध हे पाच विषय वस्तूच्या ठिकाणी नाहीत .ती निर्गुण आहे ,त्यामुळे तिला रंग असणे शक्य नाही .
तेव्हा श्रोता विचारतो :
श्रोते म्हणती कैंचे रूपआकाश ठाईचे अरूपआकाश वस्तूच तद्रूपभेद नाही । । - -५१ । ।
आकाशाला मुळातच रूप नाही मग आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे असे का म्हणू नये ?
आकाश अचळ दिसतेत्याचे काय नासो पाहतेपाहाता आमुचेनि मतेआकाश शाश्वत । । - -५३ । ।
आकाश अचळ दिसते ,त्याचे काहीच नाश पावत नाही म्हणून आकाशच शाश्वत ब्रह्म आहे
असे आम्हाला वाटते .त्यावर समर्थ उत्तर देतात :
आकाश तमापासून जालेम्हणौ काम क्रोध वेष्टिलेअज्ञान सुन्यत्व बोलिलेनाम तयाचे । । - -५३ । ।
अज्ञाने कामक्रोधादिकमोहो भये आणि शोकहा अज्ञानाचा विवेकआकाश गुणे। । - -५६ । ।
तमोगुणापासून आकाश निर्माण झाल्याने त्यात काम क्रोधा सारखे सप्त गुण असता.त्यात शून्यत्वाचा गुणही असतो शून्यत्व म्हणजे अज्ञान .अज्ञान म्हणजे जड़त्व ! म्हणजे आकाश स्थूल ,जड़ आहे .म्हणजे ते ब्रह्म होऊ शकत नाही .
आकाश आणि स्वरुपपाहाता वाटती एकरूपपरी दोघांमध्ये विक्षेसुन्यत्वाचा । । - -६१ । ।
आकाश आणि स्वरुप सारखेच वाटतात .पण दोघांमध्ये शून्यत्वाचा भेद आहे .आकाश शून्यरूप आहे तर ब्रह्मस्वरूप शून्यरूप नाही .
द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणे आकाश पाहू शकतो .पण ब्रह्मस्वरूप पाहाण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूप व्हावे
लागते , ब्रह्मात विलीन व्हावे लागते .म्हणून समर्थ म्हणतात :
आकाश अनुभवा येतेस्वरुप अनुभवापरतेम्हणोनिया आकाशातेसाम्यता घड़े । । - -६८ । ।
अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊ शकतो ,पण ब्रह्मस्वरूप अनुभवा पलिकडे आहे .त्यामुळे आकाश ब्रह्म एक असू शकत नाही .

No comments: