Tuesday, April 27, 2010

प्रत्येकाचे भाग्य वेगळे का ?


पृथ्वी मध्ये लोक सकळ येक संपन्न येक दुर्बळ येक निर्मळ येक वोंगळ काय निमित्त - -
पृथ्वीवर असंख्य माणसे आहेत .त्यातील काही श्रीमंत तर काही गरीब आहेत .काही स्वच्छ आहेत तर काही घाणेरडी आहेत ,असा फरक का ?
हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दरिद्रप्राप्ती यदर्थी संदेह नाही --
समर्थ म्हणतात :गरीबी श्रीमंती ,स्वच्छ घाणेरडा हे सगळे भेद आपल्या गुणांचा परिणाम असतो .जे गुणवान असतात ते भाग्य वैभव भोगतात .जे गुणहीन असतात ते दरिद्र भोगतात .
विद्या ,जाणतेपणा किंवा ज्ञान याला जीवनाच्या सर्व क्षेत्रात महत्त्व असते .समर्थ म्हणतात :
जाणता तो कार्य करी नेणता कांहीच करी जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे - -
जाणता माणूस श्रम करतो ,उद्योगी असतो .नेणता श्रम करत नाही .आळशी असतो .जाणता आपले काम चोख करतो .त्यामुळे तो पोट भरतो .तर नेणता पोट भरू शकत नाही .तसेच विद्या नसेल तर तो करंटा असतो विद्यावंत भाग्यवान असतो .
विद्या नाही बुध्दी नाही विवेक नाही साक्षे नाही
कुशळता नाही व्याप नाही म्हणौनि प्राणी करंटा - -१०
ज्याच्या अंगी विद्या ,हुशारी ,विवेक प्रयत्न ,कौशल्य ,व्याप यापैकी एकही गुण नसेल तर तो करंटा असतो .हे गुण ज्याच्या अंगी असतात त्याच्या वैभवाला कमी पडत नाही .
जैसी विद्या तैसी हांव जैसा व्याप तैसे वैभव तोलासारिखा हावभाव लोक करिती - -१३
विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैचा असे करंटपणे वोखटा दिसे वोंगळ आणि विकारी - -१४
माणसाजवळ जेव्हडी विद्या असते तेव्हडीच त्याच्या जवळ महत्वाकांक्षा असते .माणूस जेव्ह्डा व्याप करतो तेव्ह्डे त्याला वैभव मिळते.ज्या माणसा जवळ विद्या वैभव नाही तो मलिन पणे वावरतो .तो भाग्यहीन
असतो ,अस्वच्छ वाईट प्रवृत्तीचा असतो .
गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्त्व नाही कुशळता नाही तर्क नाही प्राणीमात्रासी - -१६
ज्या माणसाच्या अंगी गुण नाही ,मोठेपणा नाही ,समाजात वजन नाही ,कौशल्य नाही बुध्दीमत्ता नाही त्याच्या जीवनात काही स्वारस्य नाही .
या कारणे उत्तम गुण तेचि भाग्याचे लक्षण लक्षणेविण अवलक्षण सहजचि जाले - -१७
म्हणून उत्तम गुण अंगी असणे हे भाग्याचे लक्षण आहे .
जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी येक विद्या असतां महत्त्व पावे - -१८
प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोचि समर्थ नेणता जाणिजे वेर्थ नि :कारण - -१९
प्रपंच परमार्थात जाणत्याचा प्रभाव पडतो .नेणता आपले आयुष्य विनाकारण व्यर्थ घालवतो .कारण नेणतेपण किंवा अज्ञान हे सर्व वाईटाचे ,अपयशाचे कारण आहे .समर्थाँनी अनेक उदाहरणे दे हे स्पष्ट केले की नेणतेपणा अपयशाचा धनी असतो .अज्ञानाने साप कीं विंचू चावतो .अज्ञानाने जीवाचा घात होतो .आपण करत असलेले कार्य बिघडते .अज्ञानाने माणूस भ्रमात पडतो काहीतरीच वागतो .अज्ञानाने माणूस फसतो .आपली वस्तू
विसरतो .त्याच्या अज्ञानानेच शत्रु त्याला जिंकतो ,त्याची हानी होते ,संहार होतो ,आपले हित कळत
नाही .त्यामुळे यातना भोगाव्या लागतात .माणूस अधोगतीला जातो .
माणूस जेव्हा माया ब्रह्म ,जीव शिव ,सार असार या सर्वांचे योग्य ज्ञान होते तेव्हा जन्म मरणाचा फेरा चुकतो .देव निर्गुण आहे असे जाणून देव मी एकरूपच आहोत याचे जो ज्ञान करून घेतो तो मुक्त होतो .आजूबाजूला दिसणारे दृश्य जेव्हा मिथ्या असे साधक जाणतो तेव्हा तो दृश्याला ओलांडतो.त्याचा मीपणा नाहीसा असतो .मी पणाने वावरणारी अहंता नाहीशी होते .केवळ शुध्द आत्मस्वरूप शिल्लक राहते .तेच त्याचे आत्मज्ञान !

2 comments:

Unknown said...

swami Samantha.........

Unknown said...

shree swami Samantha.....