Thursday, April 8, 2010

सत्संगाचा महिमा




मोक्षास कैसे जाणावे । मोक्ष कोणास म्हणावे । संतसंगे पावावे । मोक्षास कैसे । । । ८ -७ -२ । ।
मोक्षाला कसे ओळखावे ?मोक्ष कशाला म्हणावे ? सत्संगाने मोक्ष कसा प्राप्त होतो ?या प्रश्नांची उत्तरे समर्थ देतात :
तरी बध्द म्हणिजे बांधला आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला
तो संतसंगे कैसा लाधला तेंहि एका - -
बध्द म्हणजे बांधलेला ,मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळा झाला .बध्द बंधनातून फक्त सद्गुरुंच्या कृपेनेच मोकळा होतो .कारण जीवाला संकल्पाचे बंधन असते .मी जीव आहे ,मला जन्ममरण आहे ,केलेल्या कर्माचे फळ मला भोगायचे आहे असे संकल्प मनामध्ये असल्यामुळे जीव बध्द होतो ,अशा संकल्पामुळे जीवाची देह्बुध्दी घट्ट होते आणि त्याची देहापुरती अल्प ,संकुचित मनोवृत्ती बनते.पापकर्माचे दू : पुण्यकर्माचे सुख माला भोगायचे आहे अशी कल्पना असते म्हणून जीव जीवपणाने बांधलेला असतो .रेशमाचा किडा जसा आपल्या भोवती कोश विणतो त्या कोशात गुदमरून जातो ,त्याप्रमाणे जीव अनेक संकल्प करतो आणि जन्ममरणाच्या चक्रात आडकतो बध्द होतो .
पाप पुण्य जेव्हा सामान होते तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते .असा हा दुर्लभ नरदेह मिळूनही तो मूर्ख वाया
घालवतात .हा देह वाया घालवणे ही एक प्रकारे आत्महत्या आहे असे समर्थ म्हणता कारण पुन्हा नरदेह मिळेल अशी खात्री नसते .संकल्पाने बांधून घेउन आपण आपला शत्रु होतो ,म्हणून काय करायला पाहिजे ते समर्थ सांगता :ऐसे संकल्पाचे बंधन संतसंगे तुटे जाण - -३२ संत्संगाने संकल्पाचे बंधन तुटते
कारण समर्थ म्हणतात :
तेचि वस्तू ते आपण हे महावाक्याचे ल्क्षण साधू करिती निरूपण आपुलेनि मुखे - -५८
जेचि क्षणी अनुग्रह केला तेचि क्षणी मोक्ष जाला बंधन नाही आत्मयालाबोलोचि नये - -५९
जेव्हा माणूस आत्मानात्म विवेक करतो तेव्हा माणसाला मी देह नसून आत्मा आहे याची खात्री पटते .ही गोष्ट केवळ आत्मज्ञानी महात्माच आपल्या निरूपणातून पटवून देऊ शकतो .आत्मज्ञानी संतच महावाक्यांचा अर्थ लोकाना समजावून सांगू शकतात .ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याक्षणी मोक्ष प्राप्ती होते .एकदा का मोक्ष मिळाला की देह्बुध्दी नाहीशी होते ,संकल्पातून येणारी दु:खे नाहीशी होतात ,संदेहवृती नाहीशी होते .त्यासाठी मात्र आत्मानात्म विवेक सत्संगती आवश्यक असते .


No comments: