Sunday, April 25, 2010

करून अकर्ता आणि भोगुन अभोक्ता कोण ?

सकळ करून अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता । सकलामध्ये अलिप्तता । येईल कैसी । । ९ -३ -२ । ।
तथापि तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता स्वर्गनर्क ही आता येणेची न्याये। । - -
जन्म मृत्य भोगिलेच भोगी परी तो भोगून अभोक्ता योगी यातना ही तयालागी येणेची पाडे -- ।।
कुटून नाही कुटिला रडोनि नाही रडला कुंथों नाही कुंथिला योगेश्वर - -
श्रोता क्षे घेतो की माणूस ब्रह्मज्ञानी असला तरी त्याला यातना ,दु: ,संकटे भोगावी लागतात .याचा त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नाही का ?सगळी कर्मे करून अकर्तेपणा ,सगळे भोग भोगून अभोक्तेपणा , सर्वांमध्ये राहून अलिप्तपणा कसा येईल ?समर्थ उत्तर देतात :
ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा संपदेविण जो धिवसा तो निरर्थक - -
ज्याला जसा अनुभव येतो त्याला प्रमाण धरून तो जीवनाचा अर्थ समजतो .उदा: ज्याच्या जवळ संपत्ती नसते तो मोठे साहस करू शकत नाही .त्याला मोठ्या साहसाची कल्पना करता येत नाही .तसे ज्याच्या जवळ आत्मज्ञान रूपी संपत्ती नसते त्याच्या जवळ अज्ञान रूपी दारिद्र्य असते .तो जन्म मृत्यु च्या फे-यात अडकतो . ज्याप्रमाणे भूतबाधा झालेला माणूस भूतबाधा नाहीशी झालेला यांची योग्यता वेगवेगळी असते त्याप्रमाणे जीवन्मुक्त ज्ञानी देहाने दिसले तरी त्यांची योग्यता नसते.आत्मज्ञानी माणसाचे थोरपण स्वस्वरूपाच्या नुसंधानात असते .
जो जो ज्ञाने गुप्त जाला जो विवेके विराला जो अनन्य पणे उरला नाहींच काही - -१९
आत्मज्ञानाने जो गुप्त होतो म्हणजे ज्याचा मीपणा अंतर्धान पावतो ,निदिध्यासाने स्वस्वरूपात विलीन
होतो ,स्वस्वरूपाशी एकरूप होतो .तो वेगळेपणाने उरत नाही .
देही पाहता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्या - -१९
दिसतो जरी देहधारी परी कांहीच नाही अंतरी तयास पाहता वरीवरी कळेल कैसा - -२०
जो त्याला शोधायला जातो तो स्वत : तेच रूप बनतो .मग तदाकार झाल्यावर बोलणे ,चालणे,शोध घेणे सगळे थांबते .देहात पहायला गेले तर तो देहात आढळत नाही .ब्रह्मामध्ये तो ब्रह्मस्वरूप होउन असतो .जो त्याला शोधायला जातो तो स्वत : तेच रूप बनतो .मग तदाकार झाल्यावर बोलणे,चालणे,शोध घेणे सगळे खूंटते.देहात पहायला जावे तर तो देहात आढळत नाही ,पंचभूतातही आढळत नाही .ब्रह्मामध्ये ब्रह्म स्वरुप होउन तो
असतो .त्याला स्वरूपाहून वेगळे काढता येत नाही .बाहेरून तो सामान्य माणसासारखा देहधारी असतो .पण अंतरी 'मी देह आहे 'अशी जाणीव नसते .त्याला वरवर पाहून त्याची अवस्था कळत नाही .
तो परमात्मा केवळतयास नाही माया मळअखंड हेतूचा विटाळजालाच नाही । । - -२२ । ।
तो शुध्द केवळ परमात्मस्वरुप असतो .त्याच्या जवळ मायेचा मळ नसतो .कोणत्याही संकल्पांचा स्पर्श त्याला होत नाही .त्याची अंतरिक स्थिती वेगळी असते .त्याला कोणताही इच्छा ,वासना ,संकल्प नसतात .तो स्वस्वरूपाचा अनुभव परब्रह्माशी तदाकार होउन घेतो .त्यामुळे तो स्वत :चा राहत नाही .'देव पहाया गेलो आणि देवचि होऊनी ठेलो !'अशा अनुभवाचा धनी होतो .त्यामुळे अविद्या जीवपणा नाहीसा होतो .त्याला जन्म मरण उरत नाही .सगळीकड़े तो गच्चपणे भरून असतो .
तसा साधू आत्मज्ञानी ,ज्ञानाने पूर्ण समाधानी ,निदिध्यासाने अनन्य होउन आत्म स्वरूपाकार बनतो .

No comments: