Wednesday, September 21, 2011

आवाहन आणि विसर्जन

आवाहन आणि विसर्जन म्हणजे काय ?

आवाहन आणि विसर्जन | हेची भजनाचे लक्षण | सकळ जाणती सज्जन | मी काय सांगो ||

२०-८-३० ||

पूजेसाठी देवाला बोलावणे हे आवाहन ,व पूजा झाल्यावर देवाला स्वस्थानी पोचवणे हे विसर्जन

साधकावस्थेत दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व पहाणे हे

आवाहन .निरंजन परब्रह्म हे अंतरात्म्याचे स्वस्थान आहे .दृश्य विश्वात सर्व ठिकाणी

अंतरात्म्याचा महिमा पाहतां आल्यावर तेथून निर्विकार निरंजन केवळ दृश्यरहित परब्रह्मा पर्यंत

पोहोचणे हे अंतरात्म्याचे विसर्जन आहे .

दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्मा बघायचा म्हणजे काय असा प्रश्न पडतो .

घरापासून सुरुवात करू .स्वच्छ सुंदर घर ,नीटनेटक्या वस्तू ,मंगल सुंदर वातावरण ,तेथे

परमेश्वरी वास आहे असे जाणवणे ,घराबाहेर छानशी रांगोळी ,स्वच्छ परिसर ,प्रसन्न वातावरण

पाहून आनंदी होणे म्हणजे अंतरात्म्याला पाहणे आहे .

हिरवीगार वनश्री ,फळांनी लगडलेले वृक्ष ,सुंदर आकर्षक रंगाचे फुलांचे ताटवे पाहून आनंद

घेताना परमेश्वराला आठवणे म्हणजे अंतरात्म्याला पहाणे .दुथडी भरून वाहणारी नदी

,कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, धबधब्याच्या पाण्याचा खळखळाट ,बघून ईश्वरी शक्तीचा

प्रत्यय घेणे म्हणजे अंतरात्मा पाहणे .

भूकंप ,सुनामी ,पूर यांसारखे निसर्गाचे रौद्र रूप बघून ईश्वराची किमया कशी आहे याचा प्रत्यय

घेताना ईश्वराची आठवण होणे म्हणजे अंतरात्मा आठवणे .निसर्गातील असंख्य प्राणी ,वनस्पती

,त्यांचे गुण दोष पाहून ईश्वराने केलेल्या किमयेचा प्रत्यय घेणे म्हणजे अंतरात्म्याला बघणे

.निसर्गात आढळलेली कोणतीही भव्य दिव्य गोष्ट पाहून मन आश्चर्य चकित होऊन ईश्वराची

आठवण होणे म्हणजे अंतरात्मा पहाणे .

अशाच रीतीने सर्वत्र अंतरात्मा पहात असताना कोणतीही कामना ,कल्पाना वासना न उरता ,जे

जे काही घडते ,ते अंतरात्म्या मुळे असा दृढ निश्चय होऊन शेवटी सर्वत्र परब्रह्म परमात्मा

ब्भारून राहिला आहे अशी खात्री होते .हे दृश्य विश्व मिथ्या आहे हे ,हे खरे नाही अशीही खात्री

होते .मग दृश्य विश्व नाहीशी होते आणि परब्रह्माची भेटी होते .मग माझे मी पण उरत नाही .

मीपणा संपतो तेव्हा परब्रह्माची भेटी तर होतेच पण त्यालाच विसर्जन असे ही म्हणतात

No comments: