Wednesday, September 21, 2011

आंतरात्म्या चे गुण

अंतरात्म्याचे गुण कोणते ?

अंतरात्म्याची वोळखण | तेचि जेथे चपळपण | जाणीवेचे अधिष्ठान | सावध ऐका || २०-६-९ ||

जेथे चपळपण आहे ,तेथे अंतरात्मा असतो .जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असते .म्हणून जेथे जेथे जाणीव असते ,तेथे तेथे अंतरात्मा असतो .पण जाणीव उत्पन्न होताना अनेक प्रकारची रूपे घेते .

सुख दु:ख जाणता जीव | तैसाची जाणावा सदा शिव | अंत:करणपंचक अपूर्व |अंश आत्मयाचा || २०-६-१० ||

सुख व दु:खाची जीवाला जाणीव असते .त्याचप्रमाणे ती सादाशिवाला म्हणजे जगदीश्वराला सुध्दा असते .विलक्षण असे अंत:करणपंचक म्हणजे अंत:करण ,मन ,बुद्धी ,चित्त अहंकार ,हे अंतरात्म्याचे अंश आहेत .तसेच आकाशाचे गुण असलेले काम ,क्रोध ,भयं ,शोक ,मोह आत्म्याचे अंश आहेत .सत्व ,रज ,तम हे त्रिगुण ही आत्म्याचे गुण आहेत .

श्रोते विचारतात ,महाराज ,या आत्म्याचे आणखीन कोणते गुण असतात ते कृपा करून सांगावे .’’

श्रीसमर्थ सांगतात :

नाना चाळणा नाना घृती | नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती | अलिप्तपण सहजस्थिती | गुण आत्मयाचे || २०-६-१२ ||

द्रष्टा साक्षी ज्ञानघन | सत्ता चैतन्य पुरातन | श्रवण मनन विवरण |गुण आत्मयाचे || २०-६-१३ ||

दृश्य द्रष्टा दर्शन |ध्येय ध्याता ध्यान | ज्ञेय ज्ञाता ज्ञान | गुण आत्मयाचे || २०-६-१४ ||

वेदशास्त्रपुराणअर्थ | गुप्त चालिला परमार्थ | सर्वज्ञपणे समर्थ | गुण आत्मयाचे || २०-६-१५ ||

बध्द मुमुक्ष साधक सिद्ध |विचार पाहाणे शुध्द | बोध प्रबोध |गुण आत्मयाचे || २०-६-१६ ||

जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या | प्रकृती पुरुष मूळमाया | पिंड ब्रह्मांड अष्टकाया | गुण आत्मयाचे || २०-६-१७ ||

परमात्मा आणि परमेश्वरी | जगदात्मा आणि जगदेश्वरी | महेश माहेश्वरी | गुण आत्मयाचे || २०-६-१८ ||

अनेक प्रकारचे विचार ,धैर्य ,नवविधा भक्ती ,चार मुक्ती ,अलिप्तपणा ,सहजस्थिती ,द्रष्टा ,साक्षी ,ज्ञानघन ,सत्ता ,चैतन्य ,पुरातन ,श्रवण ,मनन ,विवरण ,दृश्य ,द्रष्टा ,दर्शन ,ध्येय ध्याता ध्यान ,ज्ञेय ज्ञाता ,ज्ञान या त्रिपुटी ,वेद शास्त्र ,पुराणे ,यांचा अर्थ ,गुप्तपणे चाललेला परमार्थ ,सर्वज्ञ पणे आलेले सामर्थ्य ,बध्द मुमुक्षु साधक सिद्ध ,शुध्द विचार ,बोध ,प्रबोध ,जागृती स्वप्न सुषुप्ती ,तुर्या ,प्रकृती पुरुष ,मूळमाया ,पिंड ब्रह्मांड ,आठ देह ,परमात्मा ,परमेश्वरी ,जगदेश्वरी ,महेश ,माहेश्वरी ,हे सर्व आत्म्याचे ,जाणीवेचे व्यक्त होण्याचे प्रकार आहेत .

जेव्हडे सूक्ष्म नामरूप आहे तेव्हडे सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहेत .सूक्ष्माच्या प्रांतात अंतरात्मा

जाणीवेची अनंत रूपे घतो .आदिशक्ती ,शिवशक्ती ,मुख्य मूळमाया ,सर्व प्रकारच्या शक्ती

,नाना पदार्थांची उत्पत्ती ,स्थिती ,पूर्वपक्ष ,सिध्दांत ,गाणे बजावणे ,संगीत ,अनेक अद्भूत विद्या

,ज्ञान अज्ञान ,विपरीत ज्ञान ,असद्वृत्ती ,सद्वृत्ती ,ज्ञान,अलिप्तपण ,पिंड ब्रह्मांडातील तत्वांचा

शोध ,अनेक तत्वांचा शोध ,अनेक तत्वांचा निवाडा ,स्पष्ट विचार करणे ,ध्यान ,अनुसंधान

,अनेक स्थिती ,अनेक प्रकारचे ज्ञान ,अनन्य आत्मनिवेदन ,३३ कोटी देव ,८८ हजार ऋशी

,भूतपिशाच्च ,३|| कोटी भुतावळ ,५६ कोटी चामुंडा ,९ कोटी कात्यायनी ,चंद्र ,सूर्य ,तारामंडळे

नक्षत्रे ,ग्रहमंडळे ,शेष ,कूर्म ,मेघमंडळे ,देव ,दानव ,मानव ,अनेक प्रकारचे जीव ,सर्व प्रकारचे

भाव अभाव ,असणे ,नसणे हे सगळे अंतरात्म्याचे गुण आहेत .

आत्माराम उपासना | तेणे पावले निरंजना |नि:संदेहे अनुमाना | ठावचि नाही || २०-६-३० ||

अनेक प्रकारच्या गुणांनी अंतरात्मा दृश्यात भरलेला आहे .असे त्याला पहाणे ही अंतरात्म्याची

उपासना आहे .अशी उपासना जो करतो ,त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होते .तो नि:संदेह होतो

.मग कल्पना उरत नाही

No comments: