Friday, September 9, 2011

चांगला नेता बनण्यासाठी महंता ने काय करावे ?

महंताने कसे असावे हे सांगितल्यावर शिष्यांनी प्रश्न विचारला : महंताने चांगला नेता होण्यासाठी काय करावे ?

समर्थ सांगतात :

नाही देहाचा भंरवसा | केव्हा सरेल वयसा | प्रसंग पडेल कैसा | कोण जाणे || १९-६-२५ ||

याकारणे सावधान असावे | जितुके होईल तितुके करावे | भगवदभक्तीने भरावे | भूमंडळ || १९-६-२६ ||

आपणास जे जे अनुकूल | ते ते करावे तत्काळ | होईना त्यास निवळ | विवेक उमजावा ||१९-६-२७ ||

विवेकामध्ये सांपडेना | ऐसे तो कांहीच असेना | एकांती विवेक अनुमाना |आणून सोडी ||१९-६-२८ ||

अखंड तजविजा चाळणा जेथे | पाहाता काय उणे तेथे | येकांतेवीण प्राणीयांते | बुद्धी कैसी ||१९-६-२९ ||

येकांती विवेक करावा | आत्माराम वोळखावा | येथून तेथवरी गोवा | कांहीच नाही || १९-६-३० ||

समर्थ सांगतात की देह केव्हा पडेल याचा भंरवसा नसतो .म्हणून सावधपणे आज लोकांसाठी जेव्हडे करता येईल ते करावे .भगवंताच्या कीर्तीने सारे जग भारून टाकावे .आज जे करणे अनुकूल आहे ते ताबडतोब करून टाकावे .जे आपल्या कडून होण्यासारखे नाही त्यावर विवेक करावा .विवेकाने सर्व काही साध्य होते ..जे आपल्या कडून होत नाही ते अनुमानाला येते .विवेक एकांतातच करता येतो .म्हणून महंताने एकांत करावा .एकांतात जाऊन आत्मारामाचा साक्षात्कार करून घ्यावा म्हणजे मग सर्व गोष्टी स्पष्ट होतात .नीट होतात .कोणत्याही शंका रहात नाहीत .

No comments: