Wednesday, September 21, 2011

शरीरा सारिखे यंत्र दुसरे नाही

||शरीरासारिखे यंत्र |दुसरे नाही ||

ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या प्रपंच वृक्ष खूप वाढला .प्रपंचवृक्षाला अनेक रसाळ फळे लागली .त्या

फळांची गोडी चाखण्यासाठी अनेक प्रकारची शरीरे निर्माण झाली .त्यातले सर्वात उत्तम शरीर

मानवाचे निर्माण झाले .करण या शरीरात इतर प्राण्यांपेक्षा जाणीवेचे प्रमाण सर्वात अधिक आहे

सर्व प्राण्यांना बघायला डोळे ,ऐकायला कान चाखायला जीभ ,स्पर्श कळण्यासाठी त्वचा ,हुंगण्या

साठी नाक असते .पण सर्व प्राण्यांमध्ये ,मानव देहाने या पंचेंद्रीयांनी मिळणा-या ज्ञानाचा

उपयोग इतर प्राण्यांपेक्षा जास्त करून घेता येतो .मानवाने अनेक औषधी वनस्पती शोधून

काढल्या .मानव जातीला उपयोगी पडतील अशा वनस्पती निर्माण केल्या .मानवाला हानिकारक

असलेल्या वनस्पतींवर नियंत्रण मिळवले .

मानवाने आपल्या हातांच्या कौशल्याने अनेक प्रकारची कलमे करून फळांचे ,फुलांचे प्रकार

निर्माण केले .ज्या फुलांकडे पाहून आनंद मिळेल ,ज्या फळांचे रस चाखून जिभेला आनंद

मिळेल अशी फुले ,फळे मानवाने या देहाच्या सहाय्याने निर्माण केली .वन्य प्राण्यांवर आपल्या

बुद्धीसामर्थ्याने नियंत्रण मिळवले .मानव देहामुळेच आपल्या बुद्धीसामर्थ्यावर मानवाला उपयोगी

पडतील अशा प्राणी व वनस्पतींच्या जाती निर्माण केल्या .

निसर्गातील ज्या ज्या सुंदर गोष्टी आहेत ,उत्तम आहेत ,त्यांचे दृष्टी सुख मानव त्याच्या

शरीरातील डोळ्यांनी घेतो ,अनेक प्रकारच्या रसनांचा स्वाद त्याच्या रसनेने घेता येतो .सुमधुर

,सुश्राव्य संगीत ऐकून मानवाला त्याचे कान तृप्त करून घेता येतात .त्वचेतील शीतोष्ण

संवेदनांनी मानवाला आपले संरक्षण करून घेता येते .

या सर्व गोष्टीत असे दिसते ,की माणसात जाणीवेचे प्रमाण इतर प्राण्यांच्या मानाने खूपच

जास्त असते म्हणून मानव आपल्या देहाच्या सहाय्याने १४ विद्या ,६४ कलांमध्ये प्राविण्य

प्राप्त करून घेऊ शकतो .मानव देहामधील मानव विचार करू शकतो ,म्हणून या दृश्य विश्वा

बद्दल ,ते विश्व ज्या नियमांनी चालते ,त्या नियमांबद्दल विचार करतो .या नियमांचा वापर

करून ,मानवाला उपयोगी पडतील अशा वस्तू तो निर्मांकरू शकतो .ध्वनी लहरींचे संकलन

करून त्या पून्हा वितरीत करण्याचे काम मानवच करू शकतो .अनेक मार्गांनी वीज निर्माण

करून ती घराघरांत पोचोवण्याचे कामही मानच करू शकतो .हे दृश्य विश्व कशामुळे निर्माण

झाले ,आपल्या दृष्टीला दिसणारे सूर्यमंडळ ,त्यातील ग्रह ,गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी चालते

म्हणून सूर्यमालेतील ग्रह स्वत:भोवती फिरत फिरत सूर्या भोवती फिरतात ही गोष्ट मानवाला

समजून घेता आली .सूर्य मालेचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न मानव करतो आहे .हे विश्व का

निर्माण झाले ? हे विश्व असेच का निर्माण झाले ? असे अनेक प्रश्न मानवाला पडतात .त्यांची

उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न मानव करतो आहे .

जन्म मृत्यू पुनर्जन्म ,मृत्युनंतर प्राणी म्हणजे त्याच्यातील चैतन्य कोठे जाते अशा अनेक

प्रश्नांची उत्तरे मानव मिळवू लागला आहे .

कर्मेंद्रियांच्या द्वारा माणूस विषयभोग भोगतो .मानव त्रिगुणांचा बनलेला आहे . म्हणजे त्यांचा

स्वभाव सत्व ,रज ,तम या तीन गुणांपैकी एकां गुणाचे प्राबल्य असणारा असतो .पण अवगुण

टाकून चांगले गुण अंगी बाणण्याचे सामर्थ्य फक्त मानव देहातच आहे .असा हा मानव देह

म्हणजे एक उत्तम यंत्रच आहे .

No comments: