चौदा ब्रह्मे सांगितल्यावर समर्थ म्हणतात :
पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे । मा ते हाती धरून घ्यावे । ७ -३ -५२ । ।
ब्रह्म हातात धरता येइल असा पदार्थ नाही .म्हणून चौदा ब्रह्मे तोकडी पडली .मग शिष्य विचारतात :
मग ब्रह्म आहे तरी कसे ?
समर्थ सांगतात :ज्याप्रमाणे आकाश निर्मल असते त्याहून ही ब्रह्म मिर्मल असते .ते आकाशा सारखे पोकळ व अवकाशमय आहे .२१ स्वर्ग व सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो .अशा अनंत ब्रह्मगोलांना ब्रह्म व्यापते .समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात ,रिता ठाव या राघवेवीण नाही । राघव म्हणजे परब्रह्म .त्याच्या शिवाय एकही अशी जागा नाही जेथे ब्रह्म नाही .जली स्थली काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे .ज्याप्रमाणे जलचरांच्या सर्व बाजूंनी जल असते त्याप्रमाणे सर्वत्र ब्रह्म व्यापून असते .
परी जे अखंड भेटले । सर्वांगास लिगटले। अति निकट परी चोरले । सकलांसी जे । । ७ -४ -८ । ।
जन्मा पासून मृत्यु पर्यंत ब्रह्म सतत आपल्या बरोबर असते .सर्वांगाला चिकटलेले असते .पण एवढे निकट असून त्याची जाणीव आपल्याला नसते .अज्ञानी लोकांना ब्रह्म भासत नाही पण भ्रमाने निर्माण झालेले विश्व त्याने त्याचा भास् समजतो .
ज्याप्रमाणे अभ्रांनी आकाश मलिन झाल्यासारखे वाटते ,तो भास् असतो त्याप्रमाणे ब्रह्म व विश्वाचे असते .विश्व हा भास ब्रह्माला अच्छादतो पण ब्रह्माला चिकटत नाही .विश्व ब्रह्मात दिसत असलेला भास असतो .
ब्रह्म ब्रह्मांडी कालावले। पदार्थाशी व्यापून ठेले । सर्वांमध्ये विस्तारले । अंशमात्रे । । ७ -४ -१५ । ।
ब्रह्म सर्व विश्वात कालवले आहे ,सर्व पदार्थात ,चराचरात असते ,ते ही अंशमात्राने.ब्रह्माच्या अफाट भागावर एक अंश इतके हे ब्रह्मांड पसरले आहे .ब्रह्मांड सोडून ब्रह्माचा केव्हढा पसारा आहे त्याचे मोजमाप करणे अशक्य
आहे .ब्रह्म सर्वात कालवले असेल तरी अखंड स्थिर आहे ,ते स्थिर आहे ,पंचभूतांमध्ये ते आंत बाहेर व्यापले
आहे .पण पंचभूतांना चिकटलेले नाही .ब्रह्माला दृष्टांत फक्त आकाशाचा देता येतो .खंब्रह्म -आकाश हेच असे श्रुती
सांगते .गगन सदृशं ब्रह्म आकाशासारखे ब्रह्म हे स्मृती सांगते .ब्रह्म सर्वांना व्यापून आहे .आपल्या आत बाहेर सर्वत्र आहे .फक्त ते पाहण्याची शक्ती आपल्याकडे नाही .
जेथे काही नाही असे आपल्याला वाटते तेथे ब्रह्म असते .आपल्याला जे जे दिसते ते ते खरे असे आपल्याला वाटते कारण सूक्ष्म असणा-या ब्रह्माला समजून घेण्याची कला आपल्याला साधलेली नसते .अपरंपार ,अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळे च्या सगळे मावणे शक्य नसते .ब्रह्म शाश्वत तर आहेच पण वज्राहून कठीण
आहे .ब्रह्म पृथ्वीला व्यापून असते पण पृथ्वीचा नाश झाला तरी ब्रह्म नाश पावत नाही .ब्रह्म पाण्यात व्यापून असते ते पाणी शोषले जाते तसे ब्रह्म शोषले जात नाही .ब्रह्म तेजाला व्यापून असते पण तेजाने जळत नाही .ब्रह्म वायूला व्यापून असते पण वायूप्रमाणे चळत नाही ब्रह्म आकाशाला व्यापून असते पण ते आपल्याला कळत नाही .जिकडे पहावे तिकडे ब्रह्म समोरच असते .आपल्या इंद्रियांचे व्यवहार ब्रह्मातच घडतात .
ब्रह्म आपल्या शरीरात कसे असते ते सांगतात :ग्रंथ वाचत असताना ब्रह्म वाचते ,सूक्ष्मपणे डोळ्यातून पहाते,कानाने शब्द ऐकते ,मनाने विचार करताना मनाच्या आतबाहेर ब्रह्म च असते .पायांनी वाट चालताना ब्रह्म शरीरात व्यापून असते .ब्रह्मामध्ये सर्व इंद्रिये आपापली कामे करतात पण इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यास उरत नाही .त्या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी आपली वृत्ती सूक्ष्म झाली पाहिजे .
जे जवलीच असे । पाहो जाता न दिसे । न दिसोन वसे । काही येक । । ७ -६ -४६ । ।
Tuesday, November 24, 2009
Tuesday, November 10, 2009
चौदा ब्रह्म

चौदा ब्रह्मांची लक्षणे
तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम । ते येकचि परब्रह्म । दुसरे नाही । । ७-२ -५३ । ।
तेचि कळावया कारणे । चौदा ब्रम्हांची लक्षणे । सांगिजेती तेणे श्रवणे। निश्चयो बाणे। । ७ -२ -५४ । ।
परब्रह्म एकच आहे हे कळण्यासाठी समर्थ दशक ७ समास ३ मध्ये १४ ब्रह्मांची लक्षणे सांगितली आहेत .
पाहिले ते शब्दब्रह्म । दूजे मितिकाक्षर ब्रह्म । तिसरे खंब्रह्म । बोलिली श्रुती । । ७ -३ -६ । ।
चौथे जाण सर्वब्रह्म । पाचवे चैतन्य ब्रह्म । सहावे सत्ताब्रह्म । साक्षब्रह्म सातवे । । ७ -३ -७ । ।
आठवे सगुण ब्रह्म । नववे निर्गुण ब्रह्म । दाहावे वाच्यब्रह्म। जाणावे पैं। । ७ -३ -८ । ।
अनुभव ते अक्रावे। आनंदब्रह्म ते बारावे । तदाकार तेरावे । चौदावे अनुर्वाच्य । । ७ -३ -९ । ।
ब्रह्म कसे असेल याचा विचार केला तर चौदा प्रकारे याचा विचार करता येतो .जे सूक्ष्म व अतींद्रिय आहे ,ते समजावून देण्यासाठी दृश्य पदार्थ खूण म्हणून घ्यावा लागतो .त्यासाठी हे चौदा ब्रह्म सांगितले आहेत .त्यातील दोष दाखवून चौदा ब्रह्म बाजूला सारली आहेत .
समर्थांनी प्रत्येक ब्रह्माची व्याख्या करून त्यातील मिथ्यापण दाखवले आहे .
१ .अनुभवेविण भ्रम । या नाव शब्दब्रह्म । । ७ -३-११ । स्वरूपाचा अनुभव नाही पण शब्दाने ते असे आहे ,तसे आहे असे सांगणे म्हणजे शब्दब्रह्म ! पण हे ब्रह्म परब्रह्माच्या दृष्टीने कमी आहे कारण येथे परब्रह्माबद्दल प्रत्यक्ष अनुभव नसतो .नुसते शब्दपांडित्य असते .शाश्वताचा विचार नसतो .जी सदवस्तू शब्दांनी सांगता येत नाही तिचे वर्णन करण्याचा प्रयत्न असतो -शब्दांच्या करामती करून ! सांगणा-याला मी ब्रह्माचे वर्णन सांगतो याचा अभिमान
असतो . असे असले तरी त्याला प्रत्यक्ष अनुभवाचा ओलावा नसतो .त्यामुळे ते मिथ्या असते .
२ . आता मितिकाक्षर ब्रह्म । ते येकाक्षर। । ७ -३ -११ । । ओंकार म्हणजे एकाक्षर ब्रह्म ,मितिकाक्षर ब्रह्म ! सदवस्तू विनाशी नाही. अक्षर ही मानवी कल्पना आहे त्यामुळे शाश्वताचा विचार तेथे नसतो .त्यामुळे मितिकाक्षर ब्रह्म ही मिथ्या कल्पना आहे .
३ .खंशब्दे आकाशब्रह्म ।। ७ -३ - १२। खं शब्दाने आकाश असा अर्थ दाखवतो .खंब्रह्म म्हणजे आकाशब्रह्म जे सर्वव्यापक आहे .सर्व ब्रह्मांड ज्या पोकळीत रहाते ते महदाकाश .ते ही प्रलय काळी नाहीसे होते .कारण ते पंचमहाभूत आहे .पंचमहाभूत नश्वर आहे म्हणून खं ब्रह्म अशाश्वत आहे .
४ .पंचभूतांचे कुवाडे। जे जे तत्व दृष्टीस पड़े । ते ते ब्रह्मचि चोखडे। बोलिजेत आहे । । ७ - ३- १३ । ।
सर्वब्रह्म :विश्व हेच सर्वब्रह्म असे मानले तर दृश्य नाशिवंत आहे .सर्वब्रह्म विश्वाबरोबर लय पावते .ब्रह्मदेवाची रात्र सुरु झाली की भूलोकांपर्यंत सर्व पंचमहाभूते विरायला लागतात .यात शाश्वत परब्रह्माला चंचलपणा ,
अस्थिरपणा ,लावला जातो .जे जे भूत आहे ,निर्माण झाले आहे ते ते पंचभूतात्म विश्व नाशवंत आहे म्हणून सर्व ब्रह्मही नाशवंत आहे .
५ चैतन्य ब्रह्म :
पंचाभूतादी मायेते । चैतन्यचि चेतविते। । म्हणुनी त्या चैतन्याते । चैतन्य ब्रह्म बोलिजे । । ७-३ -१५ । ।
दृश्य विश्वाला चैतन्य जिवंत ठेवते .जे विश्व नाश पावते त्याबरोबर चैतन्य ही नाश पावते .
६ सत्ता ब्रह्म :चैतन्यास ज्याची सत्ता । ते सत्ता ब्रह्म तत्वता । । ७ -३ -१६ । । चैतन्य वस्तूवर ज्याची सत्ता चालते ते सत्ता ब्रह्म ! वरिष्ठ कनिष्ठावर सत्ता चालवतो .तेथे वरिष्ठ कनिष्ठ असा भेद असतो .परब्रह्म भेदातीत
असते .तेथे मालक -नोकर ,स्त्री -पुरूष ,वरिष्ठ -कनिष्ठ असा भेद नसतो त्यामुळे सत्ता ब्रह्म ही कल्पनाच !
७ .साक्षब्रह्म : तये सत्तेस जाणता। या नाव साक्षब्रह्म। । ७ -३ -१६ । ।
सत्ता ब्रह्माला जे जाणते,ते साक्ष ब्रह्म .त्रयस्थ दृष्टीने एखाद्या वस्तूकडे पहाणे म्हणजे साक्षत्वाने पहाणे .परब्रह्मामध्ये पदार्थ नसल्याने पाहाणार कोणाला असा प्रश्न आहे .त्यामुळे तेथे साक्षित्वाला वाव नाही .म्हणून साक्षब्रह्म खरे
नाही .
८ .सगुण ब्रह्म :साक्षत्व जयापासूनी । ते ही आकळले गुणी । सगुण ब्रह्म हे वाणी । तयासी वदे। । ७ -३ -१७ । ।
सगुण जे जे गुणमय आहे ते ते नाशिवंत आहे .म्हणून सगुण ब्रह्म नाशिवंत आहे निर्गुणा पासून माया उत्पन्न झाल्यावर निर्गुण साक्षित्वाच्या गुणात सापडले .जाणणे,व्यापणे,पहाणे हे गुण निर्माण झाले .त्या गुणांमुळे निर्गुण ब्रह्माला सगुण ब्रह्म म्हणतात .पण सगुण नाशिवंत असते म्हणून सगुण ब्रह्म खरे नाही .
९ .निर्गुण ब्रह्म :जेथे नाही गुण वार्ता । ते निर्गुण ब्रह्म तत्वता । । ७ -३ -१८ । ।
गुणमय दृश्य विश्व ज्या मायेने निर्माण झाले ,जे मृगजळा प्रमाणे असते .हे दृश्य विश्व निर्माण झालेली कल्पना आहे .ते खरे अस्तित्वात नाही .त्या गुणांना ओलांडून राहणारे निर्गुण ब्रह्म ही खरे नाही .
१० .वाच्य ब्रह्म :जे वाचे बोलता आले । ते वाच्य ब्रह्म बोलिले । । ७ -३ -१९ । ।
गुण रहित ब्रह्माला ओळखण्यासाठी जी नावे दिली जातात त्यांना वाच्य ब्रह्म म्हणतात .जे वाचेने बोलता येते ते वाच्य ब्रह्म ! वाच्यांशाने अनुभवात प्रवेश करता येत नाही .म्हणून वाच्य ब्रह्म ही कल्पना च लटकी आहे .
११ .अनुभव ब्रह्म व१२ . आनंद ब्रह्म :
अनुभवासी कथिले । नवचे सर्वथा । या नाव अनुभव ब्रह्म । । ७ -३ -१९ । ।
ऐसे हे आनंद ब्रह्म । । ७ -३ -२० । ।
सुखाचा आनंदाचा अनुभव घेताना अनुभव घेताना अनुभव घेणारा मी ,ज्याचा अनुभव घ्यायचा तो आनंद ,प्रत्यक्ष अनुभव असे तीन घटक असतात .आनंद व अनुभव ह्या माणसाच्या वृती असतात .त्यामुळे ही ब्रह्म वृत्तीँबरोबर नाश पावतात .
१३ .तदाकार ब्रह्म :तदाकार ते अभेद । । ७ -३ -२१ । । जेव्हा ब्रह्माशी तदाकारता होते तेव्हा कोणतीही वृत्ती तेथे रहात नाही .जोपर्यंत तदाकारता येत नाही तोपर्यंत अविद्या नाहीशी होत नाही .तोपर्यंत वृत्ती पुन्हा पुन्हा खाले
येते .म्हणून तदाकार ब्रह्म ही परब्रह्म नाही .
१४ अनिर्वाच्य ब्रह्म :अनुर्वाच्यी संवाद । तुटोनी गेला । । ७ -३ -२० । ।
अनिर्वाच्य म्हणजे ज्या बद्दल बोलता येत नाही .ब्रह्म अनिर्वाच्य आहे असे आपण म्हणतो तेव्हा वृत्ती च्या अनुरोधाने खूण म्हणून शब्द्द वापरला जातो .जेव्हा ब्रह्माशी तदाकारता येते तेव्हा वृत्ती उरत नाही वृती उरत नाही तेव्हा वाच्यता नसते .जे वाच्य नाही ते अनिर्वाच्य .पण अनिर्वाच्य शब्दही वृत्तीच्या संबंधाने योजला
जातो .म्हणून अनिर्वाच्य ब्रह्म म्हणने ही गौण च !

Thursday, November 5, 2009
परब्रह्म नक्की कसे आहे ?
सत्यब्रह्म ते कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । प्रत्योत्तर दे आपण । वक्ता श्रोतयासी। । ७ -२ -४२ । ।
सत्यब्रह्म नक्की कसे आहे ? असा प्रश्न श्रोते विचारतात ,त्याला समर्थ उत्तर देतात .परमात्म वस्तू एकच एक
आहे .सर्व दृष्टींनी अनंत आहे .त्याच्यात अनंत शक्ती अनंत प्रमाणात वास करतात .प्रत्येक माणसाची मनोरचना वेगवेगळ्या प्रकाराची असते .त्यामुळे प्रत्येकाला ब्रह्माच्या वेगवेगळ्या अंगाचा अनुभव येतो .जसा अनुभव त्याला येतो तसे ब्रह्म त्याला भासते .
काही जणांना ब्रह्माचे अनंतपण ,काहींना अलिप्तपण ,काहींना निवांतपण ,काहींना सर्वज्ञपण ,काहींना त्याचे सत्तास्वरुप भासते .तर कोणाला ब्रह्म नादस्वरूप ,ज्योतीरूप ,काहींना साक्षीरूप,कोणाला शब्दरूप ,चैतन्य रूप ,अशा अनेक प्रकारे अनुभवास येते .
खरे तर ब्रह्म नामरूपातीत आहे.ते निर्मळ ,निश्चल,शांत ,स्वानंदघन आहे .ब्रह्म अरूप आहे कारण त्याला पाहता येत नाही ,अगोचर आहे कारण ईंद्रियांना त्याचे आकलन होत नाही ,अच्युत आहे कारण ते स्थान सोडत नाही ,अनंत आहे कारण त्याला आदि व अंत नाही ,अपरंपार आहे कारण त्याला मर्यादा नाही ,अदृश्य आहे ,अतर्क्य
तर्कापलिकडे ,अपार म्हणजे पार नसलेले आहे .
सुन्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञं। सर्वात्मा जगजीवन । ऐसी नामे । । ७ -२ -४८ । ।
ते शून्य ,सनातन ,सर्वेश्वर सर्वज्ञं ,सर्वात्मा जगाचे जीवन आहे .
सहज आणि सदोदित । शुध्द बुध्द सर्वातीत । शाश्वत आणि शब्दातीत । ऐसी नामे । । ७ -२- ४९ । ।
सहज आणि सदोदित म्हणजे नेहमी असणारे शुध्द -कोणताही मळ नसणारे ,सर्वातीत म्हणजे सर्वांच्या पलिकडे ,शाश्वत -कायम टिकणारे ,शब्दातीत म्हणजे शब्दांनी न बोलता येणारे ,विशाळ म्हणजे अतिशय भव्य ,असणा-या परब्रह्माला आत्मा ,परमात्मा ,परमेश्वर ,ज्ञानघन,पुरातन चिद्रूप चिन्मात्र असेही म्हणतात .२१ स्वर्ग व ७ पाताळ मिळून एक ब्रह्मगोल ,अशा अनेक ब्रह्म गोलांना ब्रह्म व्यापते . जळी,स्थळी,काष्ठी ,पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून
असते .ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही .मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात ,'रीता ठाव या राघवेवीण
नाही '.ज्याप्रमाणे समुद्रातील माशांना पाणी आतबाहेर व्यापून असते त्याप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आतबाहेर व्यापून असते .
ब्रह्माला कोणतीही उपमा देता येत नाही ,कारण ब्रह्म इंद्रियानी जाणता येत नाही .माणूस जेव्हा दोन गोष्टींची तुलना करतो तेव्हा तो त्याला इंद्रियानी जाणता येणा-या वस्तूंची तुलना करतो .पाणी कोठेतरी संपते व जमीन सुरु
होते ,पण ब्रह्म सर्वत्र असते ते संपत नाही ते आपल्याला व्यापून असते .पण आपल्याला त्याची जाणीव
नसते .
तयामधेचि असिजे । परी तयास नेणिजे। उमजे भास नुमजे । परब्रह्म ते । । ७-४-९ । ।

Saturday, October 31, 2009
मी कसा नाहीसा होतो ?
मी नाहीसा करण्या साठी कोणाकडे शिकावे ?
आता मनासी जे अप्राप्त । ते कैसे होइल प्राप्त । ऐसे म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाही । । ७-२-१२ । ।
मी देह आहे या घट्ट समजुती मुळे परमार्थ साधत नाही .सद्गुरूजवळ ते कसे शिकावे ?असा प्रश्न शिष्य विचारतात तेव्हा समर्थ म्हणतात की धान्याने कोठारे भरलेली आहेत पण कुलुपे लावली आहेत .त्यांची किल्ली आपल्याजवळ नसेल तर त्यातील वस्तू अप्राप्य होतात तसे मनाला जे अप्राप्त असते ,ते आपल्याला मिळत नाही कारण देह्बुध्दी हे कुलुप असते .त्या कुलुपाची किल्ली आपल्याला सापडत नाही .
तेव्हा शिष्य विचारतात ,
तरी ते किली ते कवण । मज करावी निरूपण । ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी । । ७ -२ १४ । ।
श्रोता समर्थांना विनंती करून विचारतो ती किल्ली कोणती ते कृपा करून सांगा .
समर्थ उत्तर देतात -
सद्गुरू कृपा तेचि किल्ली । जेणे बुध्दी प्रकाशिली । द्वैत कपाटे उघडली । येकसरी। । ७ -२- १५। ।
समर्थ सांगतात की सद्गुरुकृपा हीच किल्ली आहे तिच्यामुळे आत्मज्ञान होते द्वैताची दारे उघडतात म्हणजे सद्गुरु कृपेने देह्बुध्दी जावून आत्मबुध्दी प्रकट होते .द्वैताची कपाटे म्हणजे सत्य -मिथ्या ,हर्ष -शोक ,मी -तू ,
माझे -तुझे , या द्वैताच्या कल्पनांच्या आड परब्रह्म दडलेले असते सद्गुरु कृपेने द्वैत कल्पना मावळून अद्विताचा अनुभव येतो .देह्बुध्दी मुळे जीव द्वैताच्या कोंडीत पकडलेला असतो .आत्मबुध्दी निर्माण झाली की जीवाचे वेगळेपण गळून पडते आत्म्बुध्दीत मन मनपणाने उरत नाही .जीव शिव बनतो .मग सुखाला वाण नसते .अनुसंधान रूप झाल्याने वेगळेपणाने साधना नसते .

Subscribe to:
Posts (Atom)