Saturday, January 8, 2011

भारतीय समाजाची स्थिती

समर्थ कालीन भारतीय समाजाची स्थिती कशी होती ?

श्रोते प्रश्न विचारतात ,महाराज ,आपण देशभर पर्यटन केलेत ,तेव्हा समाज स्थिती कशी आहे ते कृपा करून आम्हाला सांगा .समर्थ सांगतात :

जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती | सारिख्या नस्ती आदी अंती | नेमची नाही पाहावे किती | काये म्हणोनि | | १५-२-२ | |

म-हाष्ट देश थोडा उरला | राजकारणे लोक रुधिला | अवकाश नाही जेवायला | उदंड कामे | | १५-२-३ | |

कित्येक युध्दप्रसंगी गुंतले | तेणे गुणे उन्मत्त जाले | रात्र दिवस करू लागले |युद्धचर्चा | |१५-२-५ | |

उदिम्यास व्यासंग लागला | अवकाश नाहीसा जाला | अवघा पोटधंदाच लागला | निरंतर | |१५-२-६ | |

व्यक्ती तितुक्या प्रकृती असतात .प्रत्येक जण वेगळा असतो .त्यामुळे माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात .पुष्कळ लोक बाटले ,पोर्तुगीज राज्यात नाहीसे झाले ,जाती ,धर्म ,भाषा ,प्रांत यामुळे एकमेकांना दुरावले .सगळा समाज सुस्त ,कोणतेही चैतन्य नसलेला गलितगात्र होता .फक्त महाराष्ट्रात थोडे चैतन्य आहे .तेथे राजकारणाला वाव आहे .पण तेथे माणसांना जेवायला फुरसद नाही .युध्दात वेगवेगळ्या कामात गुंतलेली असतात . त्यांच्या बोलण्याचा विषय असतो फक्त युध्द !

षडदर्शने नाना मते | पाषांडे वाढली बहुते | पृथ्वी मध्ये जेथ तेथे | उपदेसती | | १५-२-७ | |

स्मार्थी अथवा वैष्णवी | उरली सुरली नेली आघवी | ऐसी पाहता गथागोवी | उदंड जाली | |१५-२-८ | |

कित्येक कामनेचे भक्त | ठाईं ठाईं जाले आसक्त | युक्त अथवा अयुक्त | पहातो कोण | |१५-२-९ | |

या गल्बल्या मध्ये गल्बला | कोणीं कोणीं वाढवला | देखो सकेनासा जाला | वैदिक लोक | | १५-२-१० | |

त्याही मध्ये हरिकीर्तन | तेथे वोढले कित्येक जन | प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान |कोण पाही | |१५-२-११ | |

या कारणे ज्ञान दुर्लभ | पुण्येघडे अलभ्य लाभ | विचारवंता सुल्लभ | सर्व काही | | १५-२-१२ | |

बुद्धीच्या क्षेत्रात षड्दर्शने ,इतर अनेक मते ,समाजघातक मतांची वाढ झाली .उरलेल्या लोकांना स्मार्त आणि वैष्णव लोकांनी आपल्या मध्ये ओढून नेले .सकाम भक्त आसक्त असतात .ते योग्य अयोग्याचा विचार करत नाहीत .काही लोक हरिकीर्तनाकडे ओढली जातात ,प्रत्यक्ष अनुभवाचे ब्रह्मज्ञान कोणाकडे नसते . खरे ज्ञान दुर्लभ झाले .

Wednesday, January 5, 2011

चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा-या साठी


चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा -या साठी
समर्थांचा महंत ज्याने लोकसंग्रह करून देश ,देव ,धर्म याविषयी जागृती करायची आहे त्याच्या अंगी चातुर्याचीकोणती लक्षणे हवीत असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ उत्तर देतात :
अस्ति मासांची शरीरे । त्यांत राहिजे जीवेश्वरे । नाना विकारी विकारे । प्रवीण होइजे । । १५-१-१ | |
जीव जीवात घालावा । आत्मा आत्म्यात मिसाळावा । राहं राहो शोध घ्यावा । परांतराचा । । १५-१-४ | |
तैसेची हे मनास मन । विवेके जावे मिळोन । ढिलेपणे अनुमान । होत आहे । । १५-१-६ | |
या अस्थिमांसाने भरलेल्या शरीरात ईश्वर जीव रूपाने वास करतो .जसजसे शरीरात बदल होतात ,तसतसेजीवही आपल्यात बदल घडवून आणतो .प्रत्येकाच्या शरीरात असणारा जीवात्मा जाणीव मय असतो .त्याजाणीवेच्या सहाय्याने दस-याच्या अंत :करणात काय चालले आहे ते शोधता येते .आपल्या बोलण्यावागण्यानेदुस-याला काय वाटले असेल याची कल्पना करता येते .जसे ढिले ठेवलेले जानवे दिसायला चांगले दिसत नाहीत्याचे पदर गुंततात ,त्याउलट नीट ठेवलेले जानवे चांगले दिसते .तसे आपण विवेकाने दुस-याच्या भावना जाणूशकतो ,दुस -याच्या मनाचा ठाव घेता येतो ।
जो जगदांतरी मिळाला । तो जगदांतरचि जाला । अरत्री परत्री तयाला। काय उणे । । १५-१-१४ | |
एकदा का माणूस दुस-याच्या मनाचा ठाव घ्यायला शिकला ,की तो जगाच्या अंतरंगाशी एकरूप होतो ,सर्व लोकांचेअंत :करण तोच होतो .जसे समर्थ बालपणापासून विश्वाची चिंता करत होते .मग अशा माणसाला जग किंमतदेते ,मान देते .मग त्यांना वशीकरणासारख्या क्षुद्र गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही ।
लोकसंग्रह करताना भोवताली जमा होणारी माणसे कशी असावीत ,ते समर्थ सांगतात :
आचार विचारेविण । जे जे करणे तो तो सीण । धूर्त आणि विचक्षण । तेची शोधावे । । १५-१-२४ | |
जे लोक जे खरे नाही ते खरे मानतात ,त्याचा अभिमान धरतात ,जे खरे आहे ते सोडून देतात ,ते मूर्ख असतातआचार विचार न सांभाळता जे लोक काम करतात ,ते वाया जाते .म्हणून लोकसंग्रह करणा-यांनी सरसकटकोणालाही आपल्या हाताखाली घेऊ नये.चतुर व बुध्दीमान माणसे शोधून काढावी ।
याकारणे मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य । येणे करिता असंख्य । बाजारी मिळती । । १५-१-२६ | |
लोक संग्रह करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित माणसांशी स्नेह जोडावा ,त्यांच्या बरोबर सख्य जोडले तर त्यांनामानणारे असंख्य लोक आपल्याला वश होतात ।
समर्थाचे राखता मन । तेथे येती उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती । । १५-१-२९ | |
वोळखीने वोळखी साधावी । बुध्दीने बुध्दी बोधावी । नीती न्याये वाट रोधावी । पाषांडाची । । १५-१-३० | |
समाजातल्या प्रतिष्ठित माणसांना आपलेसे केले की सामान्य माणसे मेंढरासारखी मागे येतात म्हणून समर्थसांगतात की ओळखीने ओळख वाढवावी ,साधेपणाने रहात आपल्या बुध्दीने आपल्या शिकवणूकीतून लोकांची बुध्दी प्रगल्भ करावी .लोकां मध्ये आपलेपणा निर्माण करावा ।
वेष असावा बावळा । परी अंतरी नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये । । १५-१-३१ | |
निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान । प्रगट जाणता सज्जन । दुल्लभ जगी । । १५-१-३२ | |
नाना जिनस पाठांतरे । निवती सकळांची अंतरे । चंचळपणे तदनंतरे सकळां ठायी । । १५-१-३३ | |
बाहेरून वेष बावळा असला तरी अन्तर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे .लोकांचे अंत :करण सांभाळण्याचीहातोटी असावी .अत्यंत निस्पृह व नेहमी ताजे असणारे आत्मज्ञान त्याच्या जवळ ओतप्रोत भरलेले असावे .अनेकलोकांना आकर्षून घेण्याची कला त्याच्या जवळ असावी .त्याने सतत फिरत असावे .एका ठिकाणी थांबू नयेथांबल्याने भेटी गाठी होत नाहीत .लोकसंग्रह थांबतो .
, . .

Tuesday, December 28, 2010

माया कल्पना मात्र कशी असते ?

दशक १४ स ,१० मध्ये श्री समर्थांनी माया कल्पना मात्र कशी असते ते दाखविण्यासाठी अनेक दाखले दिले आहेत ।
माया म्हणजे काय ? माया म्हणजे असते एक आणि दिसते भलतेच .माया कशी असते ते सांगताना श्री समर्थ म्हणतात :
करंटा पडोन उताणा । करी नाना परी कल्पना । परी ते काहीच घडेना । तैसी माया । । १४-१०-२ | |
द्रव्यदारेचे स्वप्नवैभव । नाना विलासे हावभाव । क्षणिक वाटे परी माव । तैसी माया । । १४-१०-३ | |
गगनी गंधर्व नगरे । दिसताती नाना प्रकारे । नाना रूपे नाना विकारे । तैसी माया । । १४-१०-४ | |
लक्ष्मी राया विनोदाची । बोलता वाटे साची । मिथ्या प्रचित तेथेची । तैसी माया । । १४-१० -५ | |
मेल्याचा मोहोछाव करणे। सतीचे वैभव वाढवणे । मसणी जावून रुदन करणे । तैसी माया । । १४-१० -७ | |
राखेसी म्हणती लक्ष्मी । दूसरी भारदोरी लक्षुमी । तीसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया । । १४-१०-८ | |
मुळी बालविधवा नारी । तिचे नाव जन्म सावित्री । कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया । । १४-१०-९ | |
दशअवतारातील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा । नदी नामे पियुष्णा । तैसी माया । । १४-१०-१० | |
एकदा करंटा माणूस उताणा पडून आकाशाकडे पहातो आहे .मनात नाना प्रकाराच्या कल्पना करतो आहे .त्यापैकी एकही कल्पना प्रत्यक्षात घडत नाही ,तशी माया असते .एका माणसाला स्वप्न पडले ,त्यात त्याने बायको आणिपैसा यांचे वैभव पाहिले ,नाना प्रकाराचे विलास पाहिले ,हावभाव पाहिले ,पण तो जसा भास् असतो तशी मायाअसते .आकाशात अनेक प्रकाराची गंधर्व नगरे निरनिराळे आकार असतात ,त्यात अनेक रूपे व अनेक विकारदिसतात ,पण तो नुसता देखावा असतो .माया तशीच असते .एखाद्या प्रेताचा महोत्साव करणे,सती जायलानिघालेल्या स्त्रीचे वैभव वाढवणे ,स्मशानात जाऊन रडणे,या गोष्टी जशा कल्पनामय असतात ,तशी मायाकल्पनामय असते ।
ठेवलेल्या बाईला लक्षुमी म्हणतात ,गर्भपात न व्हावा म्हणून गर्भवतीच्या कमरेला दोरी बांधतात त्या दोरी लालक्षुमी म्हणतात .अशी माया असते .एखादी बालविधवा आहे ,पण तिचे नाव जन्मसावित्री आहे .आडनाव कुबेरआहे पण घरोघरी भीक मागतो आहे ,हे जसे आहे तसे मायेचे स्वरुप आहे .अशा पध्दतीने श्री समर्थांनी मायेचेस्वरुप सांगितले आहे .समर्थ म्हणतात :
साऊली आणि अंधकार । येक होता तेथीचा विचार । उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया । । १४-१०-१६ | |
सावली आणि अंधार दोन्हीत प्रकाश नसतो .त्यात प्रत्यक्ष वस्तू दिसत नाही .पण वस्तूच्या आकाराची किंचितसावली दिसते ,यावरून परब्रह्माचा विचार आपल्याला करता येतो .माया म्हणजे अंधार ,दृश्य म्हणजे सद्वस्तूचीसावली ,मायामय मी असतो ,देहाहंकार असतो .तो छाया रूपाने दृश्य विश्व पहातो .कारण त्याच्या जवळअज्ञानाचा अहंकार असतो .त्यामुळेच त्याला [मीला] ब्रह्मस्वरूपाचे खरे ज्ञान होत नाही .

Friday, December 10, 2010

पंचमहाभूतांचा मूळमायेत लय कसा होतो ?

पृथ्वी जळापासूनि जाली । पुढे ती जळी मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासून । । १४-९-६ | |
ते जळ तेजे शोषिले । महत्तेजे आटोन गेले । पुढे तेजचि उरले । सावकाश | | १४-९-७ | |
तेज जाले वायो पासूनि । वायो झड़पे तया लागूनी । तेज जाऊनी दाटणी । वायोचीच जाली । । १४-९- ८ | |
वायो गगना पासुनी जाला । मागुता तेथेची विराला । ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांत शास्त्री । । १४-९-९ | |
गुणमाया मूळमाया । परब्रह्मी पावती लया । ते परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे । । १४-९-१० | |
पाण्यापासून पृथ्वी झाली ,पण ती पाण्यात बुडते ,विरते .तेजापासून पाणी तैयार होते पण पाण्याला तेज शोषतेमहातेजाने पाणी आटते ,तेज शिल्लक उरते .वायु पासून तेज होते .मग वायु तेजाला विझवतो .मग तेज जावूनवायु सर्वत्र गच्चपणे भरून रहातो .वायु आकाशापासून निर्माण होतो .वायु आकाशातच विरतो .गुणमायाजिच्यामुळे पंचमहाभूते निर्माण होतात ,तिच्यात आकाश लय पावते .गुणमाया मूळमायेत लय पावते ,आणि मूळमाया परब्र्ह्मात लय पावते .
.

Monday, November 29, 2010

अखंड ध्यान म्हणजे काय ?

आपण आपल्या डोळ्याने दुस-याचा डोळा पाहतो .मनाने दुस-याचा मनाचा शोध घेतो .तसेच आपल्या अंतरात्म्याच्या सहाय्याने दुस-याच्यात असलेला अंतरात्मा पाहता येतो .अंतरात्माच सर्व काही घडवून आणत असतो .त्याच्या शिवाय देह काहीच करू शकत नाही .आपण जी हालचाल करतो ,ती हालचालही अंतरात्माच आपल्याकडून करवून घेत असतो .त्यामुळे अंतरात्मा जाणून घेण्यासाठी त्याचे अखंड ध्यान करायला हवे .समर्थ म्हणतात :
अखंड ध्यानाचे लक्षण । अखंड देवाचे स्मरण । याचे कळता विवरण । सहजचि घड़े । । १४-८-२४
सहज सांडून सायास । हाचि कोणी येक दोष । आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरती । । १४-८-२५
परि ते धरीताही धरेना । ध्यानी येती वेक्ती नाना । उगेची कष्टती मना । कासाविस करुनी । । १४-८-२६
अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण ! ध्यान आणि स्मरण यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे .देवाचे सतत स्मरण केले की देवाशी सतत अनुसंधान रहाते .मग ते स्मरणच ध्यान होते .बरेच वेळा मुद्दाम जेव्हा ध्यानाचा प्रयत्न केला जातो तेव्हा ध्यान करणारा मी व ज्याचे ध्यान करायचे तो असे वेगळे होते मग ते ध्यान अनात्म्याचे होते .प्रयत्न करूनही ध्यान टिकत नाही ,कारण ध्यानात अनेक नको त्या गोष्टी येतात ,अनेक व्यक्ती येतात ,मग मन कासाविस होते .एखाद्या मूर्तीचे ध्यान करू लागले तर ती मूर्ती न दिसता वेगळेच दिसते .जे भासायला नको ते भासते .त्यासाठी आपली श्रध्दा नक्की कोठे आहे ते ओळखायला शिकायला हवे .तरच ध्यान साधते ।
ध्यान साधण्यासाठी साधकाचे मन एकाग्र असायला हवे ,एके ठिकाणी गोळा व्हायला हवे .मनात विचारांचा गोँधळ असेल ,अनेक विचार मनात असतील तर ध्यान नीट लागत नाही .समर्थ म्हणतात :
ध्यान धरिते ते कोण । ध्यानी आठवते ते कोण । दोनी मध्ये अनन्य लक्षण । असिले पाहिजे । । १४-८-३८
अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे समाधाने १४-८-३९
ध्यान करताना जो ध्यान करतो तो ,ज्याचे ध्यान करायचे आहे तो ,असे दोघे असताना त्यांच्यात समरसता होणे ,त्यांची अखंडता न लोपणे ,दोन्ही अनन्य होणे हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे .समर्थ म्हणतात ;
ध्यान करणारा व अंतरात्मा दोघेही मुळातच अनन्य आहेत .ही गोष्ट सामान्यांच्या लक्षात येत नाही .परन्तु ज्ञानी मात्र त्याचा शोध घेतो ,दोन्ही एकच असल्याची ,दोन्ही अनन्य असल्याची अनुभूती तो घेतो .म्हणून परंपरागत पध्दतीने ध्यान करणे हे ध्यानाचे लक्षण नसून अवलक्षण आहे .

आत्मसाक्षात्कारी कसा असतो ?

दशक १४ स .७ मध्ये समर्थ आत्मसाक्षात्कारी कसा असतो याचे वर्णन करतात ।
पुरश्चरणी कायाक्लेशी । दृढवतीपरम सायासी । जगदीशा वेगळे जयासी । थोर नाही । । १४-७-७
काया वाचा जीवे प्राणे । कष्टे भगवंता कारणे । मने घेतले धरणे । भजन मार्गी । । १४-७-८
ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरी विभक्त । संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणे । । १४-७-९
अंतरा पासून वैराग्य । तेंची जाणावे महदभाग्य । लोलंगते एव्हडे अभाग्य । आणिक नाही । । १४-७-१०
आत्मसाक्षात्कारी पुरश्चरणे [मंत्रामध्ये जेव्हडी अक्षरे असतील तेव्ह्ड़े लक्ष जप करणे ] करतो .शरीराला कष्ट देतो ,दृढपणे आपले व्रत सांभाळतो। .श्रम करतो .त्याला फक्त भगवंतच श्रेष्ठ वाटतो । शरीराने ,वाणीने , जीवाने ,प्राणाने तो भगवंतासाठी कष्ट करतो .त्याचे मन सतत भगवंताचे भजन करण्यात रममाण होते .असा भगवंताचा भक्त अंतरातून विरक्त असतो .भगवंतासाठी संसार सोडतो .त्याला अगदी अंतरा पासून वैराग्य आलेले असते .आसक्ती लोभ नसतो म्हणून समर्थ अशा आत्मसाक्षात्कारी माणसाला महाभाग्यवान म्हणतात ।
ऐसा जो का योगेश्वर । अंतरी प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणीमात्राचे । । १४-७-१२
ऐसी वृत्ती उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्शन मात्रे समाधान । पावती लोक । । १४-७-१३
बहुतांसकरी उपाये । तो जनाच्या वाटया न ये । अखंड जयाचे हृदये । भगवद्रूप । । १४-७-१४
जनास दिसे हा दुश्चित्त । परी तो आहे सावचित्त । अखंड जयाचे चित । परमेश्वरी । । १४-७-१५
अशा आत्मसाक्षात्कारी जो असतो त्याला समर्थ योगेश्वर म्हणतात .तो अन्तर्यामी वृत्तीने उदासीन असतो ,विवेकी असतो .विवेक त्याला स्वानुभवाने प्राप्त झालेला असतो .तो अनासक्त ,वैराग्यशील असतो .या सर्व गुणांमुळे त्याला आत्मसाक्षात्कार होतो .

Monday, November 22, 2010

गृहस्थाश्रम उत्तम का ?

गृहस्थाश्रम उत्तम का ?
नाना वेश नाना आश्रम । सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम । जेथे पावती विश्राम । त्रैलोक्य वासी । । १४-७-१
देवहृषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी । पितृआदि करून विभागी । अतीत अभ्यागत । । १४-७ -२
गृहस्थाश्रमी निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले । परन्तु गृहस्थागृही हिंडू लागले । कीर्तीरूपे । । १४-७-३
याकारणे गृहस्थाश्रम । सकळामध्ये उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया । । १४-७-४
ब्रह्मचर्याश्रम ,गृहस्थाश्रम ,वानप्रस्थाश्रम ,संन्यासाश्रम असे वेगवेगळे आश्रम आहेत .पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे कारण देव ऋषी मुनी योगी तपस्वी या सर्वांना गृहस्थाश्रमात च जन्म घ्यावा लागतो .ते सर्व जरी गृहस्थाश्रम सोडून जातात तरी कीर्ती मिळवल्यावर गृहस्थाश्रमातून त्यांची सर्व व्यवस्था होते ।
त्यामुळे या सर्व आश्रमात गृहस्थाश्रम उत्तम आहे .परंतु त्यात स्वधर्माचे आचरण व भूतदया असावी .अध्ययन ,अध्यापन ,दान ,प्रतिग्रह ही शट कर्मेही हवीत .धर्मशास्त्रा प्रमाणे सर्व क्रियांचे आचरण ही घडायला हवे .तेथेच भक्तीही आढळते .नियमीत व शास्त्रोक्त पद्धतीने आचरण ज्या गृहस्थाश्रमात होतो तो गृहस्थाश्रम धन्य असतो ,उत्तम असतो .